Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अनोळखी युवतीचा मृतदेह

पुलाखाली सापडला अनोळखी युवतीचा मृतदेह...
हत्या कि आत्महत्या चर्चेला उधान
हिमायतनगर(प्रतिनिधी)नांदेड- किनवट राज्य रस्त्यावरील करंजी - सरसमच्या मध्यभागी असलेल्या पुलाखाली एका अज्ञात युवतीचे पालथ्या अवस्थेत मृतदेह दि.२४ बुधवारी दुपारी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हत्या कि आत्महत्या चर्चेला उधान आले आहे.

याबाबत सविस्तर असे कि, बुधवार दि.२४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शौच्चालयासाठी गेलेल्या एका व्यक्तीस लालबा डबलवाड यांच्या शेताजवळील करंजी - ते सरसम बु.रस्त्यावरील पुलाखाली एका अनोळखी युवतीचा मृतदेत पालथ्या अवस्थेत दिसून आला. याची माहिती सर्वत्र पसरली यावेळी घटनास्थळी आलेले सरसम येथील पोलिस पाटील माधव नरवाडे यांनी घटनेची माहिती हिमायतनगर पोलिसांना दिली. तातडीने पोलिसांचे वाहन घटनास्थळाकडे रवाना झाले. घटना स्थळावर मयत युवती हि अंदाजे २२ वर्षीय असून, पालथ्या अवस्थेत जमिनीवर पडलेली होती. अंगात लाल रंगाचा टोप व काळ्या रंगाची पैंट तसेच गळ्यात काळ्या - निळ्या रंगाची ओढणी होती. डाव्या हाताच्या दंडला चिरलेले आणि रक्तस्त्राव झालेले दिसत होता. तर पायाला मार सुधा दिसून आला असून, कोणीतरी अज्ञातांनी तिच्यावर अत्याचार करून खून केला असावा असे या प्रकारावरून दिसून येत होते. सदरील युवतीचा मृत्यू गत दोन - तीन दिवसापूर्वी झाल्यामुळेच सर्वत्र दुर्गंधी सुटल्याचे नागरीकातून बोलले जात होते. सदर घटनेचे दृश्य पाहण्यासाठी राज्यारास्त्यावर वाहने व नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या होत असलेल्या चर्चेवरून २२ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली... कि तिने आत्महत्या केली असा तर्क वितर्क लावला जात आहे. 

याठिकाणी दाखल पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, त्यानंतर शवविछेदनासाठी सरसम बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याचा अहवाल आल्यानंतर युवतीच्या मृत्यूचे गूढ समोर येणार आहे. सध्या तरी या घटनेबाबत हिमायतनगर पोलिस डायरीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सदर घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार बालाजी लक्षटवार हे करीत आहेत.

मिसिंग युवती असण्याची शक्यता 
------------------------
तालुक्यातील धानोरा ज. येथील एक युवती तीन चार दिवसापासून मिसिंग असल्याची नोंद पोलिस दफ्तरी आहे. त्या नोंदीपासून हिमायतनगर पोलिस युवतीचा शोध घेत असून, सोमवारी हिमायतनगर पोलिसांचे पथक किनवट - नांदेड मार्गावरील रात्री ७ ते ९ वाजेच्या दरम्यान पुलांची पाहणी करीत होते. त्यामुळे आज आढळलेले प्रेत त्याच युवतीचे आहे कि अन्य कोण्या पिडीत युवतीचे हे अद्याप तरी स्पष्ट झाले नाही. याचा शोध लावणे आणि युवतीच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसासमोर उभे आहे.        

याबाबत पोलिस निरीक्षक सुरेश दळवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले आमचा सर्व दृष्टीने तपास सुरु आहे. आमचे कर्मचारी सर्व बाजूने चौकशी करीत आहेत, त्याबाबत सध्या तरी काही सांगता येत नाही. परंतु लवकरच याचा शोध लागेल असे आश्वसन त्यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या