Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

5 लाखांच्या चारचाकीसह 27 हजारांची देशी दारू पकडली

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) काल दि.24 नोव्हेंबरला रात्री दहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांनी एका चारचाकी वाहनात जाणारी 27 हजारांची दारु पकडली आहे. सोबतच तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजीनगरचे पोलीस हवालदार मारोती नारायण तेलंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आपल्या पोलीस
स्टेशनच्या जवळील गणेशनगर भागातून फुले मार्केटच्या रस्त्याने एक चारचाकी वाहन क्र.एमएच 26-एके-3969 मध्ये बेकायदेशीररित्या देशीदारु जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक के.एस.पठाण, पोलीस कर्मचारी शेख इब्राहीम, प्रदीप खानसोळे, देशमुख, पांचाळ यांनी ही चारचाकी गाडी अडविली. तेंव्हा त्या गाडीतील शेख शब्बीर शेख शहेजाद मियॉ वय 27 या चालकाने सांगितले की ही गाडी सुधीर बिडवई यांची आहे आणि ही दारु विष्णूपुरी येथून आणली आहे. आणि मालटेकडीला नेवून देणार आहे. या गाडीमध्ये 180 एमएलच्या 48 बाटल्या एकूण अकरा बॉक्स  ज्याची किंमत 27 हजार 456 रुपये आहे आणि पाच लाखांची बोल्लेरो गाडी पोलिसांनी पकडली आहे. या गाडीचा चालक शेख शब्बीर शेख शहेजाद मिया, गाडी मालक गणेश सुधीर बिडवई आणि सतीश साहेबराव नवघडे या तिघांविरुध्द महाराष्ट्र प्रोव्हीबिशनऍक्टनुसार शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या