Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विष्णुपुरी प्रकल्पाचे थकीत विजदेयकाचे दुष्टचक्र संपले

आ. हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे झाले शक्य
नांदेड (अनिल मादसवार) विष्णुपुरी प्रकल्पाचे थकीत २ कोटी ५८ लक्ष विजबिल मदत व पुनर्वसन विभागातून देण्याचे आदेश राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. आमदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे थकीत विजदेयकाचे दुष्टचक्र संपले. या विजबिलामुळे उर्वरित १२ कोटी ६४ लक्ष व्याजाची रक्कम माफ होऊन भविष्यात प्रकल्पाचा अखंडित विजपुरवठा सुरळीत राहील.

विष्णुपुरी प्रकल्पावरील थकीत विजबिलाच्या संदर्भात आमदार हेमंत पाटील यांनी एप्रिल महिण्यात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बैठक लावली होती. विष्णुपुरीच्या थकीत २४ कोटी ३६ लाखांपैकी 'कृषी संजीवनी योजने अंतर्गत' १२ कोटी ३१ लक्ष एक रक्कमी भरणा केल्यास उर्वरित १२ कोटी ६४ लक्ष विजबिल माफ होणार होते पण  तत्पूर्वी हि योजना बंद झाल्यामुळे १२ कोटी ३१ लक्ष भरणा करून देखील २ कोटी ५८ लक्ष विष्णुपुरी प्रकल्पावर विजबिल निघाले. सध्या २ कोटी ५८ लक्ष विजबिल भरल्यास १२ कोटी ६४ लक्ष माफ होतील असे महावितरण विभागातर्फे सांगण्यात आले.

विष्णुपुरी प्रकल्पातून सन २००९ ते २०१७ या कालावधीत या प्रकल्पातून टंचाईग्रस्त गावांना पाणी सोडल्यामुळे अतिरिक्त विजबिलाचा खर्च २ कोटी ९५ लक्ष एवढा आला आहे. टंचाईग्रस्त गावांना विष्णुपुरी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे शासनाचा टँकरचा खर्च वाचला आहे. यामुळे विष्णुपुरी प्रकल्पावर अतिरिक्त झालेल्या विजबिलापैकी शासनाने २ कोटी ५८ लक्ष द्यावा अशी मागणी आमदार हेमंत पाटील यांनी नांदेड दौऱ्यावर असलेले राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. त्यावर ना.चंद्रकांत पाटील यांनी संबंधित विभागाला विष्णुपुरी प्रकल्पाच्या विजबिल माफीचे आदेश दिले. या विजबिल देयकांमुळे भविष्यात प्रकल्पाचा विजपुरवठा अखंडित राहील. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या