Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

“क्रीडा महोत्सव-२०१७” स्पर्धेकरिता स्वारातीम विद्यापीठाचा संघ रवाना

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) “क्रीडा महोत्सव-२०१७” राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा दि.२७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर या दरम्यान दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या क्रीडा महोत्सवामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ सहभागी होण्यासाठी आज शुक्रवार, दि.२४ नोव्हेंबर रोजी रवाना झाला आहे. याक्रीडा महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील २० विद्यापीठे सहभागी होणार आहेत.

याक्रीडा महोत्सवामध्ये स्वारातीम विद्यापीठाचा मुले आणि मुलींचा संघ कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल इत्यादी क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे. यास्पर्धेमध्ये ६० मुले आणि ६० मुली असे एकूण १२० खेळाडूंचा समावेश आहे. संघासोबत जनरल मॅनेजर डॉ.प्रदीप देशमुख, संघ व्यवस्थापक डॉ.महेश बेंबडे, डॉ.अशोक वाघमारे, डॉ.आनंद भट्ट, डॉ.राजेश्वर पाटील, डॉ.तातेराव केंद्रे, डॉ.मीनानाथ गोमचाले, डॉ.राजेंद्र तुपेकर आणि संघ व्यवस्थापिका डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, डॉ.छाया कौठे, डॉ.वैशाली मडेकर यांच्यासह मार्गदर्शक डॉ.जी.ए.लोकरे, डॉ.सचिन चामले, सतीश मुंढे, भारत धाणले, डॉ.ज्योती चव्हाण, शिवपाल ठाकूर, विजय हंडे, प्रा.पवन पाटील, डॉ.नागनाथ गजमल, शेख सलीम, डॉ.जे.डी.कहाळेकर, लहू पठाण, डॉ.विक्रम कुंटूरवार, प्रा.संतोष सावंत, क्रीडा विभागातील एस.एम.पठाण, के.एस.हसन रवाना झाले आहेत. संघास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरु डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव डॉ.रमजान मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कातलाकुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, रासेयो समन्वयक प्रा. नागेश कांबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या