Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

येताळेश्वर मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरबडा येथे मागील 18 वर्षांपासून श्री गणेश भजनी मंडळ व सर्व ग्रामस्थांच्या वतीने या सप्ताहाचे अखंडपणे आयोजन करण्यात येते. या सप्ताहात दि 24 नोव्हेंबर 2017 रोजी बालकीर्तनकार कु गीताताई येमटे (आळंदी देवाची) किनगावकर यांचे कीर्तन रात्री ठीक 8:30 वाजता आयोजित केले आहे. तरी गावातील व बरबडा परिसरातील भाविक भक्तानी या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेऊन आपले संसार रुपी जीवन कृतार्थ करावे असे आवाहन संयोजक श्री तिप्पलवाड एन टी सर बरबडेकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या