Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिलांची बैठक


नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला संघटनेची महत्वपूर्ण बैठक दि. 25 रोज शनिवारी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. माजीमंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाध्यक्ष बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, महिला पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. प्रांजली रावणगावकर यांनी केले आहे. या बैठकीला माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, राज्य उपाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, राजेश कुटूंरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बैठकीत जिल्हातील पक्षाचा आढावा, सदस्य नोंदणी अभियान तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापर्यंत जिल्ह्यात नोंदणी अभियानाची मोहित राबविण्यात येणार आहे. याविषयी या बैठकीत चर्चा केली जाणार असून या बैठकीला जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, अध्यक्षा तसेच शहराध्यक्ष व शहर पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या