Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या... 
बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत 
हिमायतनगर| शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पेरण्यांची तयारी पूर्ण झाली असली तरी अद्याप मृग नक्षत्रातील पाऊस झाला नाही. पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतीकामे आटोपुनही नांदेड जिल्ह्यासह १६ तालुक्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर पाणी असलेल्या काही शेतकर्यांनी पेरण्या केल्या मात्र, पिकाला पाणी देता - देता वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांच्या नाके नऊ येत

आहेत. जर मृगाच्या पावसाला उशीर झाला तर, येणाऱ्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजाची चिंता वाढली असून, पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या नजारा आभाळातील ढगांकडे जात आहेत. वेळेवर पाऊस पडेल या आशेने ५० टक्के शेतकर्यांनी खते - बियाणे साठून ठेवले. तर गोर - गरीब शेतकी मात्र मोठ्या पावसाला सुरुवात झाल्या नंतरचा बियाणे खरेदी करणार आहेत. त्यामुळे एकदाचा बियाणांच्या दुकानात शेतकऱ्यांची गर्दी होणार असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लुट होण्याची आणि बोगस बियाणे माथी मारल्या जाण्याची शक्यता बळावली आहे.

गतवर्षी अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे, रब्बीची अशाही धुळीस मिळाल्यामुळे आत शेतकऱ्यांच्या सण २०१९ च्या आशा खरीपावर आहेत. मान्सून वेळेवर दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यातील पाणी असलेल्या शेतकर्यांनी धुळ पेरणी केली आहे. काहीजण पिके जागविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत आहेत. यावर्षी खरीप हंगामाची सुरुवात होऊन ७ दिवस लोटले मात्र अद्याप पाऊस बेपत्ता आहे. खरीपाच्या पेरण्यांसाठी शेतकरी सज्ज झाले असून, आता फक्त पावसाची प्रतीक्षा आहे. असे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे. यावर्षीचा खरीप चांगला असेल या आशेने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, उडीद मुग आदी पिकांची लागवड करण्याची तयारी केली आहे. मात्र अजूनही एकही मोठा पाऊस झाला नसल्याने पेरण्यासाठी शेतकर्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मागील काही वर्षात निसर्गाचा समतोल बिघडला आहे. मृग नक्षत्रातील पहिल्या आठवड्यात पाऊस पडणे ही बाब दुर्मिळ झाली आहे. शेतीची मशागत पूर्ण झाल्यानंतर अवकाळी किंवा पहिल्या पावसानंतर खरीपाच्या क्षेत्रात एदचि वखर पाळी करून शेतकरी तणकट वेचून पेरणीला सुरुवात करतात, परंतु बहुतांश तालुक्यात अजूनही मृग नक्षत्रात एकही पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सतत दोन वर्षे दुष्काळ आणि अवकाळी त्यानंतर गतवर्षीच्या अल्प पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागच्‍यावर्षी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यंदा कापूस, सोयाबिन, तृणधान्‍य , कडधान्‍य आडोसा हळद, ऊस  लागवड करण्‍याची तयारी कशी शेतकऱ्यांनी केली आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीची कामे आटोपली आहेत. आणि आत शेतकऱ्यांच्या नजर आभाळाकडे लागल्या आहेत. शेवटच्या टप्प्यातील कामे करताना उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागल्याने अंगातून घामाच्या धारा निघत आहे. अश्या परिस्थितीतही शेतकरी आगामी खरिपाचे उत्पन्न चांगले येईल या आशेने शेतीच्या कामामधेय गुंतल्याचे दिसून येत आहे. खरीपाची पेरणी करतांना शेतक-यांनी जमीनीत पुरेशी ओल झाल्‍यानंतर पेरणी केल्यास फायदेशीर ठरेल असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या