Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्‍वत:साठी वेळ काढून योग साधना व प्राणायाम करणे आवश्‍यक

नांदेड| निरोगी जिवनशैलीसाठी योगसाधना महत्‍वाची आहे. प्रत्‍येक व्‍यक्‍तींनी स्‍वत:साठी वेळ काढून योग साधना व प्राणायाम करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

योगऋषि स्वामी रामदेवजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार
दिनांक 21 जून 2019 रोजी नांदेडमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय योगदिनानिमित्‍त राज्‍यस्‍तरीय योग शिबीर घेण्‍यात येणार असून त्‍याअनुषंगाने भक्‍ती लॉन्‍स येथे आज मंगळवार दिनांक 18 जून रोजी जिल्‍हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी प्रशिक्षण शिबीर घेण्‍यात आले त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी योग गुरु डॉ. संजयजी, अनिल अमृतवार, बापु पाडाळकर, श्रीराम लाखे, शिवाजी भागवत, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, व्‍ही.आर. कोंडेकर, डी.यू. इंगोले आदींची उपस्थिती होती. पुढे ते म्‍हणाले, धकाधकीच्‍या जीवनात आपले आरोग्‍य अबाधीत ठेवण्‍यासाठी योगाची आवश्‍यकता आहे. आंतरराष्‍ट्रीय योग दिनाचे औचित्‍य साधून जिल्‍हयातील सर्व नागरीकांनी प्राणायाम व योग साधना करावी. येत्‍या 21 जून रोजी शिवरत्‍न जिवाजी महाले चौक (मामा चौक), असर्जन येथे सकाळी पाच ते साडेसात वाजेपर्यंत योगऋषि स्वामी रामदेवजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्‍यस्‍तरीय योग शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे शिबिर निशुल्‍क असून कुटूंबासह सर्व नागरीकांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकरी अशोक काकडे यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या