Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे - डॉ. गोविंद नांदेड

नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच शब्दात सांगायचं म्हणजे शिकण्याला  वयाची मर्यादी नसते तो सतत विद्यार्थी असला पाहिजे. आपण जे दहावीच्या परिक्षेत यश मिळवलात ते अभिनंदनीय आहे. या पुढे उज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घ्यावी असे प्रतिपादन राज्याचे सेवानिवृत्त शिक्षण संचालक तथा संस्थेचे सचिव डॉ. गोविंद नांदेडे यंानी केले.


विष्णूनगर येथील अशोक माध्यमिक विद्यालयात आयेाजित दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत हेाते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, किशोर स्वामी, उमेश पवळे, विरेंद्रसिंघ गाडीवाले, पत्रकार गोविंद मुंडकर, डॉ. सुधाकर देव, संस्थेचे सचिव बालाजी पांडगळे आदिंची उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ.गोविंद नांदेेडे म्हणाले विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पहावी व प्रत्येक्षात कृतीत उतरावेत यासाठी शिक्षकांनी शालेय स्तरावर ज्ञानरचना वादाचा अध्यापनात उपयोग करून विद्यार्थ्यांनाचा सर्वागीण विकास साधावा असे आवाहन करून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे डॉ. गोविंद नांदेड यांनी कौतुक केले. शाळेत राबविण्यात येणार्‍या उपक्रमाची माहिती संस्थेचे सचिव बालाजी पांडगळे यांनी प्रस्ताविकातून दिली. यावेळी मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत शाळेत गुणवंत विद्यार्थी कु. स्वामी गजभारे, स्वप्नील खानसोळे, विद्या सुरेवाड, अभिषेक पांचाळ, आकाश समते, कृष्णादास लादाडे, मयुरी बेकनाळे, आदिंचा मान्यवरांच्या हास्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमिकचे मुख्याध्यापक एस.बी. जीवबा, प्राथमिकचे मुख्याध्यापक यु.डी. वडवळे, जी.एन. वनंजे, व्हि.एन. जाधव, नागरगोजे सोनटक्के, जांभरूनकर, घोरबांड, शेख, तोकलवाड आदिंनी परिश्रम केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तोकलवाड, उपस्थितांचे आभार वनंजे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या