Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाण्यात बुडाल्याने तीन बाल विद्यार्थ्यांचा झाला मृत्यू

किनवट तालुक्यातील चिखली(ई) येथील दुर्देवी घटना

शिवणी| येथून 10 कि.मी. अंतरावरील चिखली (ई) येथील तीन बालकांचा गावाजवळील नदीत बुडून मृत्यू झाला आहे. सदर दुर्देवी घटना मंगळवारी (दि.28) दुपारी 12 ते 12:30 च्या दरम्यान घडली असून, शिवणी परिसरावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चिखली ते म्हैसा मार्गावर गावालगतच एक नदी असून, मागील काही दिवसात भरपूर पाऊस व अतिवृष्टी झाल्यामुळे, परिसरातील नदी-नाले खळाळून वहात आहेत. चिखली येथील रितेश विठ्ठल देशट्टीवार, (वय 11), गंगाधर लक्ष्मण भंडारवार (वय 14) व श्रीकर गोपाळ नागुवाड (वय १४) ही तिन्ही विद्यार्थी कोरोना प्रादुभावामुळे शाळा सुरू न झाल्यामुळे, पोहणे शिकण्यासाठी म्हणून नदीवर गेलीत. मात्र, कुणालाच पोहणे येत नसल्यामुळे व प्रवाहसुद्धा जोरात असल्याने तिघेही पाण्यात बुडाले, असे समजते. गावातील लक्ष्मण टोकलवाड, राजू टोकलवाड, प्रदीप झरीवाड, महेश मदीकुंटोल्लू, देवीदास तोटावार या युवकांनी मृतदेह पाण्यातून शोधून काढण्यासाठी परिश्रम घेतले.  

सदर बातमी लिहतांना तिन्ही मृत शरीराचा पंचनामा होऊन, शवविच्छेदन चालू होते.  परिसरातील शिवसेनेचे  युवा नेते गजानन बच्चेवार, भाजपाचे बालाजी आलेवार, विठ्ठल सिंगारवाड यांनी मयत मुलांच्या तिन्ही कुटुंबांचे सांत्वन करून धीर दिला. एकाच वेळी गावातील तीन अल्पवयीन मुलांच्या  अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

.....प्रकाश कार्लेवाड, शिवानी, ता.किनवट, जी.नांदेड.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या