Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलीसांनी 6 गोवंश जनावरे पकडली

नांदेड|
इतवारा आणि नांदेड ग्रामीण या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तल करण्यासाठी आणून ठेवलेली जनावरे पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी पकडली आहेत. त्यात नांदेड ग्रामीण पोलीसांनी तीन गोवंश जनावरे पकडून ती बाळगणाऱ्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच इतवारा पोलीसांनी तीन जनावरे पकडून दोन गुन्हे दाखल केले.
  
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक संतोष रघुनाथ जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 जुलै रोजी पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे, पोलीस उपनिरिक्षक शेख आसद, पोलीस कर्मचारी प्रमोद कऱ्हाळे, स्वामी आणि पवार हे खुदबेनगर भागात गस्त करत असतांना मलंगबाबा इमारतीसमोर कत्तल करण्यासाठी आणलेले 3 बैल असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी शेख जावेद, शेख अहेमद (25) रा.खुदबेनगर याच्या ताब्यात ही तीन जनावरे होती. शेख जावेदला विचारणा केली असता ही जनावरे कत्तल करण्यासाठी आणल्याचे सांगितले. या तिन्ही जनावरांची किंमत 45 हजार रुपये आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शेख जावेद शेख अहेमद विरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 च्या कलम 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गोवंश जनावरे पकडल्याची माहिती पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांनी दिली. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कत्तल करण्यासाठी आणलेल्या 6 जनावरांना आज पोलीसांनी पकडून गुन्हे दाखल केला आहेत. मागील आठ दिवसांमध्ये पोलीसंानी 60 गोवंश जनावरे पकडली आहेत. 

........रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या