Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ग्रामीण पोलीसांनी कत्तल करण्यासाठी आणलेले तीन गोवंश पकडलेे

 
नांदेड|
नांदेड ग्रामीण पोलीसांनी कत्तल करण्यासाठी आणलेले ती बैल पकडून एका व्यक्तीविरुध्द प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस नाईक प्रविण केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 जुलै रोजी पोलीस उपनिरिक्षक शेख आसद, पोलीस कर्मचारी मलदोडे, रेवननाथ कोळनुरे हे गस्त करत असतांना गोरक्षक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाजेगाव कत्तलखान्याजवळ 30 ते 40 बैल कत्तल करण्यासाठी बांधून ठेवले होते. त्यावेळी अनेक दुसरे कार्यकर्ते आले तेंव्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर आणि पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील यांनी पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे यांना दिलेल्या आदेशानुसार आम्ही सर्व जण वाजेगाव चौकी येथे गेलो. 

तेथे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एकनाथ देवके, त्यांचे सहकारी मामुलवाड आणि महिला गृहरक्षक यांच्यासोबत कत्तल खान्याजवळ गेलो. तेथे एका घरापलिकडे दोन बैल आणि एक गोरा बांधलेला होता. या तिन्ही जणांवरांची किंमत 85 हजार रुपये आहे ही जनावरे शेख महेबुब शेख दाऊत रा.वाजेगाव यांची होती. शेख मेहबुब यांच्याकडे जनावरांच्या दाखल्याची विचारणा केली असता ते नसल्याचे त्यांनी सांगितले. ही जनावरी त्यांनी कत्तल करण्यासाठी आणली आहेत म्हणून त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 च्या कलम 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या