Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वजिराबाद पोलीसंानी तीन मोटारसायकलसह चोरटा पकडला

न्यायालयाने 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले 

नांदेड| वजिराबाद पोलीसांनी एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून  दीड लाख रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या. न्यायालयाने या चोरट्याला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. 

दि.29 जुलै रोजी वजिराबादचे  बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेले पोलीस निरिक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल पुंगळे, पोलीस कर्मचारी गजानन किडे, बबन बेडदे, संजय जाधव, चंद्रकांत बिरादार, संतोष बेल्लूरोड, शरदचंद्र चावरे, जसप्रितसिंघ शाहु, नितीन बुताळे हे गस्त करत असतांना बसस्थानक ते मिलगेट या रस्त्यावर त्यांना आदर्श अनिल कामठीकर हा युवक दिसला. पोलीसांना पाहुन तो मोटारसायकलवर  बसून पळून जावू लागला. त्याचा पाठलाग करून त्याला पकडले असता मोटारसायकल चोरीची असल्याचे कळले त्यासोबतच त्याच्याकडून इतर दोन अशा एकूण 3 मोटारसायकली दिड लाख रुपये किंमतीच्या पोलीसांनी जप्त केल्या. 

या प्रकरणी दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यात आदर्श अनिल कामठीकर (19) रा. महावीर चौक नांदेड यास गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस हवालदार शंकर ढगे आणि त्यांचे सहकारी विशाल वाघमारे यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या मोटारसायकल चोरट्यास 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. मोटारसायकल चोरीचा गुन्हेगार पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, दत्ताराम राठोड, पोलीस उपअधिक्षक अभिजित फस्के यांनी कौतुक केले आहे. 

दरोड्यासह एक चोरी आणि तीन मोटारसायकल चोऱ्या 
नांदेड| काल दि.29 जुलै रोजी दुपारी सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार घडला होता. त्यात लाखो रुपयांचे सोन्याचे दागिणे, दरोडेेखोरांनी लुटले होते. त्यानंतर दुपारी इतवाराच्या सराफा मार्केटमध्ये एका महिलेच्या बॅगमधून 1 लाख 30 हजार रुपयांचे दागिणे चोरण्यात आले. तसेच 3 मोटारसायकली चोरीला गेल्या. अशा प्रकारे दरोडा आणि इतर चार अशा 5 घटनांमध्ये 8 लाख 96 हजार 81 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. 

दत्तनगर भागात मुक्तेश्र्वर शहाने यांच्या स्वामी समर्थ ज्वेलर्स या दुकानावर 29 जुलैच्या 11 वाजता दरोडा पडला. त्यात 6 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. या दरोड्याचा तपास शिवाजीनगरचे पोलीस उपनिरिक्षक थोरवे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास अनघा विश्र्वजित महाजन रा. छत्रपती चौक ह्या सराफा मार्केटमध्ये गेल्या होत्या. कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधील 1 लाख 29 हजार 81 रुपयांचे सोन्याचे दागिणे चोरले आहेत. अनघा महाजन यांच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे अधिक तपास करीत आहेत. 

या व्यतिरिक्त तीन मोटारसायकल चोऱ्या पोलीस दप्तरी नोंद आहेत. त्यात धानोरा (ता) ता.हदगाव येथील रामराव गणपतराव वानखेडे यांचा 23 जुलै रोजी रात्री 8 वाजता वाळकी (बा) शिवारात अपघात झाला . त्यावेळी त्यांची गाडी एम.एच.26 बी.एफ.4998 अपघातस्थळी पडून होती आणि ते उपचारासाठी नांदेडला आले. 24 जुलैच्या सकाळी 11 वाजता पाहिले तर ही 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी अपघात स्थळावरून चोरीला गेली होती. हदगाव पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार राठोड करीत आहेत. 

वजिराबाद येथून अनुप भास्कर भाले यांची एम.एच.24 यु.1416 ही 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 9 जुलैच्या सायंकाळी 5 ते 10 जुलैच्या दरम्यान चोरीला गेली. या प्रकरणी वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार शंकर ढगे अधिक तपास करीत आहेत. ही गाडी वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने जप्त केली आहे. इमरान खान मुजीब पाशा यांची मोटारसायकल क्रमांक एम.एच.26 ए.एन.6166 ही 12 हजार रुपये किंमतीची दुचाकी 12 जुलै रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेदरम्यान तरोडेकर चेंबर्स येथून चोरीला गेली. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार फोले करीत आहेत. 

...रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या