Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण

आज 134 बाधीत रुग्ण; नांदेड शहरात 46; ग्रामीण भागात 88

नांदेड|
कोविड विषाणु कोणत्याच परिस्थितीत थांबण्याची चिन्हे  नाहीत. त्याचा रेकॉर्डबेक्र आकडा देत कोरोनाने मागील 24 तासामध्ये एकूण 134 कोरोना बाधीत रुग्ण दिले. सोबतच कोरोना मृत्यूमध्ये सुध्दा 24 तासात रेकॉर्डब्रेक आकडा कोरोने दिला असून चार महिला आणि 6 पुरूषांचा कोरोना बाधेने मृत्यू झाला आहे. एकाच झटक्यात कोरोनाने ऍक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या पाचशेच नव्हे तर सहाशेपार करून 700च्या जवळ अर्थात 667 संख्या झाली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये निगेटीव्ह संख्या दोन आकडी असून पॉझिटीव्ह संख्या तीन आकडी झाली आहे. एकुण कोरोना रुग्णांची संख्या 1528 आहे. अशा प्रकारे शरिराच्या प्रत्येक रोमारोमातून घामफुटेल अशी संख्या कोरोनाने आज दिली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार 28 जुलै रोजी सरकारी रुग्णालय विष्णुपूरी येथे नवीन मोंढा येथील 63 वर्षीय पुरूष, रिठा ता.भोकर येथील 57 वर्ष पुरूष, देगलूर येथील 65 वर्षीय महिला असे तीन रुग्ण मरण पावले. खाजगी रुग्णालय नांदेड येथे कुंभार गल्ली वजिराबाद येथील 74 वर्षीय पुरूष आणि वजिराबाद येथील 71 वर्षीय महिला अशा दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 27 जुलै रोजी सरककारी रुग्णालय नांदेड येथे जुना कौठा येथील 50 वर्षीय पुरूष, सिडको नांदेड येथील 68 वर्षीय पुरूष, मुदखेड येथील 70 वर्षीय महिला, मोमीनपुरा किनवट येथील 70 वर्षीय महिला, कासराळी ता.बिलोली येथील 80 वर्षीय पुरूष अशा 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बाधीत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या आता 70 झाली आहे. पंजाब भवन-21, लोहा-7 आणि औरंगाबाद -1 अशा 30 रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आल्याने आजपर्यंत  770 कोविड रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज दि.28 जुलै रोजी प्राप्त झालेल्या 284 स्वॅब अहवालांपैकी 89 अहवाल निगेटीव्ह आणि 134 अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या 1527  झाली आहे. सुट्टी मिळालेल्या रुग्णांना वगळता आता सध्या ऍक्टीव्ह कोरोना बाधीत रुग्ण 677  आहेत. ज्यामध्ये 5 महिला आणि 6 पुरूष अशा 11 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपात आहे.

कोरोना बाधेने नांदेड शहरात 46 रुग्ण दिले आहेत. त्यामध्ये सर्वाधीक रुग्ण पाठक गल्ली नांदेड येथे 19 रुग्ण आहेत. त्यामध्ये 12 पुरूष ज्यांचे वय 22, 25, 28, 32, 34, 46, 46, 54, 56, 60, 62, 77 असे आहे. 7 महिला ज्यांचे वय 20, 40, 42, 55, 56, 63, 77 असे आहेत. किल्ला रोड नांदेड एक महिला 37 वर्ष, शिवाजीनगर नांदेड एक महिला 30 वर्ष, शारदानगर तीन पुरूष 9, 11 आणि 77 वर्षाचे, एक महिला 70 वर्षाच्या , अंबिका नगर एक पुरूष 62 वर्ष, हिंगोली गेट एक पुरूष 67 वर्ष, नवीन कौठा एक पुरूष 38 वर्ष, एक महिला 60 वर्ष, शिवशक्तीनगर एक पुरूष 54 वर्ष, भावसार चौक एक पुरूष 19 वर्ष, हैदरबाग एक पुरूष 53, दत्तनगर एक महिला 60 वर्ष, मोमिनपुरा एक महिला 55 वर्ष, दिलीपसिंघ कॉलनी  एक पुरूष 58 वर्ष व एक महिला 72 वर्ष, पीजी हॉस्टेल एक पुरूष 25 वर्ष, हडको 4 महिला 12, 35, 54 आणि 60 वर्षाच्या, सिडको दोन पुरूष 3 आणि 35 वर्षाचे, दोन महिला 30 आणि 35, जीएमसी स्टॉफ एक महिला 31 वर्ष, वजिराबाद एक पुरूष 55 वर्ष असे असे 46 रुग्ण आहेत.

ग्रामीण भागातात 88 रुग्ण आले आहेत. त्यात सर्वाधिक संख्या मुखेड आणि देगलूरची आहे. त्यात राजखोड भोकर एक पुरूष 35 वर्ष, कुंभारगल्ली भोकर एक महिला 65 वर्ष, कासराळी ता.बिलोली एक पुरूष 46 वर्ष, सगरोळी ता.बिलोली 6 पुरूष 6, 35, 36, 38, 42 आणि 50 वर्ष,तीन महिला 30, 40 आणि 57 वर्षाच्या, बापूनगर देगलूर एक पुरूष 63 वर्ष, एक महिला 59 वर्ष, देशपांडे गल्ली देगलूर दोन महिला 25 आणि 56 वर्षाच्या, लाईनगल्ली देगलूर, दोन पुरूष 7 आणि 61 वर्षाचे, दोन महिला 40 आणि 61 वर्षाच्या, साधनानगर देगलूर एक पुरूष 51 वर्ष, एक महिला 26 वर्ष, नांदुर ता.देगलूर एक पुरूष 21 वर्ष, रफिक कॉलनी देगलूर एक  पुरूष 42 वर्ष, कोथेपिंपळगाव देगलूर एक महिला 61 वर्ष, नाथनगर देगलूर एक पुरूष 54 वर्ष, देगलूर एक पुरूष 51 वर्ष, कोतेकल्लूर 5 पुरूष 23, 32, 37, 40 आणि 46 वर्षाचे, तोटावार गल्ली देगलूर एक पुरूष 65 वर्षाचे, आलापूर ता.देगलूर एक पुरूष 58 वर्ष, घुमटबेस देगलूर एक पुरूष 68 वर्ष, भुतनहिप्परगा ता.देगलूर एक पुरूष 62 वर्ष,

शांतीनगर धर्माबाद एक महिला 37 वर्ष, रामनगर धर्माबाद एक पुरुष 13 वर्ष आणि दोन महिला 28 आणि 49 वर्ष, देवीगल्ली धर्माबाद एक महिला 44 वर्ष, रेल्वे गेट क्रमांक 2 धर्माबाद दोन पुरूष 23 आणि 28 वर्ष, हदगाव एक पुरूष 31 वर्ष, एक महिला 40 वर्ष, बामणी ता.हदगाव एक पुरूष 38 वर्ष, शिराढोण तांडा ता.कंधार एक महिला 61 वर्ष, दिग्रस ता. कंधार एक पुरूष 72 वर्ष, बारुळ ता.कंधार एक पुरूष 53 वर्ष, रंगारगलली कंधार एक पुरूष 35 वर्ष, मोमीनपुरा ता.किनवट एक महिला 70 वर्ष, वाहेगाव बेटसांगवी एक महिला 32 वर्ष, जानापूरी ता.लोहा एक महिला 65 वर्ष, बारुळ ता.मुखेड एक महिला 32 वर्ष, शिवाजीनगर मुखेड एक पुरूष 6 वर्ष, सराफागल्ली मुखेड एक पुरूष 38 वर्ष, दापका ता.मुखेड एक पुरूष 65 वर्ष, तगलीन गल्ली मुखेड एक पुरूष 22 वर्ष, बापशेटवाडी ता.मुखेड दोन पुरूष 5 आणि 41 वर्षाचे, खरबखंडगाव ता.मुखेड तीन पुरूष 11, 35 आणि 40 तसेच दोन महिला 40 आणि 50 वर्षाच्या, अंबुलगा ता.मुखेड एक पुरूष 8 वर्ष, एक महिला 13 वर्ष, मुक्रमाबाद ता.मुखेड दोन पुरूष 23 आणि 34 वर्षाचे, महाकाली गल्ली मुखेड एक पुरूष 50 वर्षाचे, कोळी गल्ली मुखेड तीन पुरूष 15, 32 आणि 38 वर्षाचे, एक महिला 13 वर्षाची, मुखेड एक महिला 70 वर्ष, नायगाव 4 पुरूष 11, 32, 36 व 61 वर्ष, तीन महिला 29, 32 आणि 55 वर्ष,

हिंगोली एक महिला 65 वर्ष, जालना एक पुरूष 87 वर्ष, पुसद जिल्हा यवतमाळ एक पुरूष 62 वर्ष, परभणी एक पुरूष 67 वर्ष व एक महिला 45 वर्ष असे हे नवीन 88 रुग्ण आहेत. त्यामध्ये 7 बालके 10 वर्षाखालील आहेत. आज एकूण 264 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आज अनिर्णीत असलेल्या स्वॅबची संख्या 50 आहे. नाकारण्यात आलेला 8 स्वॅब आहे. 677 ऍक्टीव्ह कोरोना बाधीत रुग्ण शासकीय रुग्णालय विष्णुपूरी- 116, पंजाब भवन-235, जिल्हा रुग्णालय-25, नायगाव-15, बिलोली-14, मुखेड-106, देगलूर 62, उमरी-10, लोहा-4, हदगाव-13, भोकर-2, कंधार-8, धर्माबाद-15, खाजगी रुग्णालय-45, औरंगाबाद-5, निजामाबाद-1 आणि मुंबई 1 असे उपचार सुरू आहेत.

...रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड. 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या