Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आज कोरोनाने दिले 114 नवीन रुग्ण 92 जणांची सुट्टी; दोन जणांचा मृत्यू

नांदेड| कोरोना विषाणुने आज 114 नवीन रुग्ण दिले आहेत. त्यात नांदेडचया मनपा क्षेत्रात सर्वाधिक 30 रुग्ण आहेत. त्या पाठोपाठ मुखेड-22, देगलूर- 17 अशी मोठी संख्या आहे. आज कोरोनाने एक महिला आणि एक पुरूष अशा दोन रुग्णांना मृत्यू दिला आहे. आता ऍक्टीव्ह कोरोना बाधीत रुग्ण संख्या 1608 झाली आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेले माहितीनुसार मागील 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू कोरोना बाधाने झाला. मरण पावणाऱ्या रुग्णांची एकुण संख्या 116 झाली आहे.  सिडको नांदेड येथील एक 72 वर्षीय महिला आणि कासराखेडा ता.अर्धापूर येथील 72 वर्षीय पुरूष अशा दोन रुग्णांचा उपचार शासकीय रुग्णालय येथे सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. हे दोन्ही मृत्यू 7 ऑगस्ट रोजी घडले आहेत. 

आज रोजी सरकारी रुग्णालय-13, पंजाब भवन-20, देगलूर-10, जिल्हा रुग्णालय-4, गोकुंदा ता.किनवट-5, खाजगी रुग्णालय-11,नायगाव-15, बिलोली-4, धर्माबाद-10 अशा एकूण 92 रुग्णांची सुट्टी झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोना बाधेतून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1415 झाली आहे. आज प्राप्त झालेल्या 456 अहवालांमधील 293 अहवाल निगेटीव्ह आहेत, 114 अहवाल पॉझिटीव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या 3156 एवढी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या आरटीपीसी तपासणीमध्ये 92 आणि ऍन्टीजेन तपासणीमध्ये 22 असे एकुण 114 रुग्ण आहेत. आज 326 स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 27 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 17 आहेत.  

आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीत अर्धापूर-2, लोहा-1, नांदेड शहर-28, देगलूर-14, नांदेड ग्रामीण-2, मुखेड-22, भोकर-4,उमरी-1, हदगाव-8, नायगाव-1, कंधार-1, बिलोली-1, किनवट-1, हिंगोली-1 परभणी-3,लातूर-1, यवतमाळ-1 असे एकुण 92 रुग्ण आहेत. आजच्या ऍन्टीजेन तपासणीमध्ये नांदेड मनपाक्षेत्र-2, अर्धापूर-4, बिलोली-3, धर्माबाद-1, देगलूर-3, किनवट-2, नायगाव-4, माहुर -3 असे 22 रुग्ण आहेत. 

आज  1608 ऍक्टीव्ह कोरोना बाधीत रुग्ण शासकीय रुग्ण विष्णुपूरी- 161, पंजाब भवन-626, जिल्हा रुग्णालय-53, नायगाव-80, बिलोली-38, मुखेड-131, देगलूर-95, लोहा-13, हदगाव-64, भोकर-8, उमरी-14, कंधार-17, धर्माबाद-21, किनवट-31,अर्धापूर-20, मुदखेड-17, हिमायतनगर-20, माहूर-18, आयुर्वेदिक शासकीय रुग्णालय-28, बारड-5, खाजगी रुग्णालय-137, औरंगाबाद-5, निजामाबाद-1, हैद्राबाद-1 आणि मुंबई 1 असे उपचार सुरू आहेत. यात 85 रुग्ण गंभीर स्वरुपात आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या