Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना बाधिताच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लीम कोरोना योद्यांची धर्मनिरपेक्ष कामगिरी - NNL

हिमायतनगर| शहरातील एका बड्या व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी मुस्लीम कोरोना योध्दा असलेल्या तरूणांनी घेत, कोविड-१९ चे नियम पाळत अमत्यसंसिकार कामी स्मशानभुमीत मदत केली त्यांच्या या धर्मनिरपेक्ष कामगिरीच कौतुक होत आहे.

कोरोना काळात कोणी एकमेकांच्या घरी जाण्याच टाळत आहेत, कोरोना बाधित रूग्णाला लोक सावधगिरीने घेत आहेत, कोरोना बाधितांचा मृत्यु त्यानेतर अंत्यसंस्कार म्हटल की कोणी पुढे यायला तयार होत नाही. याला अपवाद ठरले आहेत हिमायतनगर शहरातील कोरोना योध्दा ठरलेले मुस्लीम तरूण.

त्याच झाल अस की, शहरातील कपडा व्यापारी असलेल्या एका सद्गृहस्थाला कोरोना आजाराची लागण झाली होती, हैदराबाद मध्ये उपचार सुरू होते. उपचार पुर्ण होताच गावाकडे परततांना रूग्णवाहिकेत वाटेतच प्राणज्योत मालवली, गावी आल्यावर स्थानिक आरोग्य विभागाशी संपर्क साधुन, अंत्यसंस्कार कामी संघर्ष संस्कृती कला मंडळ सदस्यांची टिम तयारीला लागली.


या मंडळात बहुतेक मुस्लीम तरूण व रूग्ण वाहिकेचे मालक - चालक आहेत. कोविड- १९ च्या नियमा प्रमाणे प्रमुख सय्यद अखिल, शेख नादर, सय्यद सादिक, संदीप गगरपवाड, आकाश रणवीर, योगेश वानखेडे श्याम भारती, रितेश बोड्डेवार यांनी पिपीई किट परीधान करून मयतावर अंत्यसंस्कार केले. यावेळी मयत व्यापाऱ्याचे नातेवाईक, प्रतिष्ठीत नागरीकात कृउबाचे माजी संचालक रफिक सेठ, अल्पसंख्यांक विभाग कॉंग्रेसचे फेरोज खान, राष्ट्रवादीचे उदय देशपांडे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या