आ.जवळगावकरांच्या कार्यतत्परतेमुळं शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचणार - NNL

हिमायतनगर| विदर्भ - मराठवाडा असिमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीमध्ये मागील आठवड्यात पाणी सोडण्यात आले परंतु गंजेगाव बंधाऱ्याच्या खालील गावांना पाणी आलेच नाही. याची माहिती काही गावकर्यांनी आ.माधवराव पाटील याना देताच त्यांनी आज पैनगंगा नदीवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. लागलीच जिल्हाधिकारी डॉ विपीन यांच्याशी संपर्क साधून आणखीन ४ दलघमी पाणी सोडण्याचे मंजूर करून घेतले. त्यामुळे आता शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे मुरली बंधाऱ्यापर्यंत इसापूरचे पाणी पोचणार असल्याने या भागातील शेतकरी, गावकर्यांना दिलासा मिळणार आहे.

यंदा जानेवारी महिण्यापासूनच पैनगंगा नदी कोरडीठाक पडलाय आहे. त्यामुळे नदीकाठावर असलेल्या गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच मुकी जनावरे आणि पशु पक्षी पाण्यावाचून तडफडत असून, अनेक शेतकऱ्यांच्या सिंचन अभावी उसासह इतर पिके वाळू लागली आहेत. त्यामुळं नदीकाठावरील गावकर्यांनी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली होती. त्या मागणीची दाखल घेऊन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन यांची भेट घेऊन तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर १४ दलघमी पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली, तत्पूर्वी नदीमध्ये पाणी सोडणे गरजेचे असल्याचे अनेक ग्रामपंचायतीचे ठरावानुसार जिल्हा परिषदेने याबाबत मागणी केली होती. त्यानुसार पाणी सोडण्यात आले मात्र अजूनही पाणी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे मुरली बंधाऱ्यापर्यंत पोचले नाही.

आजघडीला गंजेगाव बंधाऱ्याच्या गेटजवळ पाणी आले असून, पुढील गावाला पाणी पोचत नसल्याने खालील गावकर्यांनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याशी संपर्क करून साहेब तुमच्याशिवाय हे शक्य नाही असे म्हणत विंनती केली होती. या भागातील गावकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन दि.२६ एप्रिल रोजी दुपारी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी गांजेगाव पुलावर जाऊन नदीपात्रात किती पाणी आले याची पाहणी केली. यावेळी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाचे डेप्युटी इंजिनिअर विवेक पाटील, ज्युनियर इंजिनियर एस के सूर्यवंशी, अनिल मादसवार, अनिल नाईक यांची उपस्थिती होती.

चर्चेमध्ये आ.जवळगावकरांनी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचण्यासाठी थेट बंधाऱ्यावरून जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्याशी संवाद साधून शेतापर्यंत पाणी पोचण्यासाठी आणखी ४ दलघमी पाणी सोडण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान्य करत तात्काळ ४ दलघमी पाणी सोडण्याचे पात्र जारी करण्यात आले असून, कार्यतत्पर आमदार मधाराव पाटील जवळगावर यांच्यामुळे मुरली बंधाऱ्यापर्यंत इसापूर धरणाचे पाणी पोचणार आहे. यामुळे नदीकाठावरील नागरिकांना दिलासा मिळणार असून, बंद पडलेल्या नळयोजना सुरु होऊन पावसाळ्यापर्यंत टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. जवळगावकरांनी नदीकाठावरील गावकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल नदीकाठावरील गावकर्यांनी आभार मानले आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी