Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भावी नवरदेवाच्या मृत्यूने वाळकेवाडी गावात शोककळा - NNL

हिमायतनगर तालुक्यातील खडकी फाटा येथे दुचाकी अपघातात झालंय निधन

हिमायतनगर| शहरात लग्नाच्या सामानाच्या खरेदि करून परत जाणाऱ्या नवरदेवाचा खडकी बा. फाट्यावर दुचाकी अपघात होऊन दुर्दैवी मृत्यु झाला आहे. हि घटना दि. २४ शनिवारी खडकी फाटा येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. यात अन्य दोघे जन जख्मी झाले असून, त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे वाळकेवाडी येथिल मयत राजु शेषराव वाळके (वय २२ वर्ष) या तरूणाचा दि. 02 में रोजी विवाह होणार होता. लग्नानिमित्त काही किरकोळ सामान घेण्यासाठी हिमायतनगर येथे तो शाईन कंपनीच्या दुचाकी क्रमांक एम.एच. २६ बि.के.३३९२ ने येवुन परत गावाकडे जातांना परतीच्या प्रवासात खडकी ब.फाट्यावर एका विना नंबरच्या दुचाकीला पाठी मागुन धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की राजु वाळके या तरूणाचा सिमेंट रस्त्यावर पडुन अतिरक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यु झाला.

तर नंबर नसलेल्या हिरो स्प्लेंडर दुचाकी वरील श्रीगणेश कलाले (वय २४ वर्ष), विनोद वांगे (वय २० वर्ष) रा. खडकी बाजार ता.हिमायतनगर हे दोघे किरकोळ जख्मी झाले आहेत. त्यांच्यावर हिमायतनगर येथील ग्रामीन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजु वाळके याचा लग्नापुर्वी दोन दिवस आधी दुर्दैवी मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अगोदरच कोरोना महामारी आणि हे अपघाताचे संकट किती जणांचे जीव घेणार अश्या प्रतिक्रिया घटनस्थाळावर उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या