Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तहसीलदारांच्या लेखी आश्वासनाने रामभाऊ गुंडेकर यांच्या उपोषणाला तात्पुरती स्थगित -NNLहिमायतनगर| तालुक्यातील दिघी या रेती घाटावरून संबंधित विभागाचे मंडल धिकारी, तलाठी यांच्याशी अर्थपूर्ण हातमिळवणी करून हजारो ब्रास रेतीचे बेकायदेशीर उत्खनन केले व त्याची साठवणूक दिघी येथील पडीक शासकीय जमीन, पोट खराब जमिनीवर ढिगारे मारून ठेवले आहेत. पैनगंगा नदीला व पर्यावरणाला बाधा पोचविणारी असून, या रेती घाटाची एटीएस मोजणी तक्रारदार व पत्रकारांसमक्ष करून अहवाल द्यावा. अन्यथा दी. २७ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा राम जळबा गुंडेकर यांनी दि.१९ में रोजी निवेदनाद्वारे दिला होता. दरम्यान तहसीलदार डी.एन.गायकवाड यांनी तीनही पथकाला शासनाच्या लाखो रुपयाच्या महसुलाचा सुरुंग लावणार्याची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश जरी केल्याचे लेखी पत्र दिल्याने तात्पुरती उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे. यावरही संबंधितांवर कार्यवाही नाही झाली तर आगामी ०५ जूननंतर याबाबत आमरण उपोषण करण्यात येईल असे गुंडेकर यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना सांगितले आहे.

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील दिघी रेती घाटावरून बेकायदा उत्खनन करून १० ते १२ ट्रैक्टरच्या चालक मालकाने वाहतूक आणि साठेबाजीचा गोरखधंदा महसूल अधिकारी -कर्मचार्यांच्या संगनमताने केला आहे. मागील तीन महिन्यात हजारो ब्रास रेतीचा बेकायदेशीर उपसा करून शासनाला चुना लाउन शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे.

याची एटीएस मशीनद्वारे चौकशी करावी, दिघी रेती घाटातून दि. १३,१४, १५ रोजी मध्यरात्रीला दिघी येथून निघालेली पळसपूर चौक ते रुख्मिणी नगर दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून वाहनाचे चालक - मालक यांच्यावर फौजदारी कार्यवाही करावी, ईटीएस मशीन मोजणींनंतर येणारी महसुलाची रक्कम संबंधित मंडळ अधिकारी तलाठी यांचे मिळकतीतून कपात करण्यात यावी, तक्रारीनंतर अल्प साठ्यावर कार्यवाही करून बहूतांश साठे माफियांना मोकळे सोडण्यात आले. याचा अहवाल देण्यात यावा, शासन नियम १९६६ चे कलम ४८(७) चा भंग करत रेती चोरी करणार्यांना अभय देत स्वार्थ साधणाऱ्याची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे. या मागणीसाठी तक्रारकर्ते तथा कट्टर शिवसैनिक रामराव गुंडेकर सरसमकर ता.हिमायतनगर हे दि.२७ पासून तहसील कार्यालयापुढे दुपारपासून कोविड -१९ च्या नियमांचे पालन करत आमरण उपोषणाला बसणार होते.

दरम्यान अचानक गुंडेकर यांच्या कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेण्याची तारीख असल्याने आणि तहसीलदार डी.एन. गायकवाड यांनी दिलेल्या चौकशीच्या लेखी आश्वासनाच्या पत्रात नमूद करून जवळगाव सज्जाचे तलाठी मंडळ अधिकारी यांना दिलेल्या पत्रानुसार हिमायतनगर तालुक्यातील अवैद्य गौणखनिज उत्खननावर आळा बसावा व शासनाचा महसूल वाढावा या दृष्टिकोनातून हिमायतनगर तालुक्यांतर्गत सर्व रेती घाटावर बैठे पथक स्थापन करण्यात आले असून, संबंधित पथक प्रमुख यांनी त्यांचे सहाय्यक पथक प्रमुख समवेत सकाळी ८ पासून ते दुसरे दिवशी सकाळी ८ पर्यंत हजार राहून हिमायतनगर तालुक्यात अवैद्य गौण खनिज उत्खनन/ वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी व अवैद्य उत्खनन / वाहतूक / साठा होत असल्यास आवश्यक कार्यवाही करावी असे आदेश दि.०१ जानेवारी ते ३१ दिसेमवार २०२१ पर्यंतच्या काळासाठी जरी केल्याचे उपोषणकर्त्यास दिलेल्या पत्रात म्हंटले आहे. त्यामुळे आपण उपोषण न करता प्रशासनास सहकार्य करावे आणि आपल्या मागणीनुसार कार्यवाहीचा अहवाल प्रपात होताच संबंधितांवर कार्यवाही होईल असेही त्यात लिहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या