Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बुलडाणा अर्बन तरोडा शाखातर्फे नेरली कुष्टधाम येथे मास्क, सैनिटायजर, बिस्किटे वाटप - NNL


नांदेड| Covid -19 च्या वाढत्या प्रादुर्भावात सामाजिक दायित्व जाणीव ठेवत, संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक (भाईजी), चीफ मेनेजिग डायरेक्टर सुकेशजी झवर, विभागीय व्यवस्थापक रोशन अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निराळी कूष्टधाम येथे आमदार बालाजी कल्याणकर यांचे बंधू राजेश कल्याणकर यांच्या हस्ते मास्क, सैनिटायजर व बिस्किटे वाटप करण्यात आली.

यावेळी कुस्ट धाम व्यावसस्थपक गायकवाड मॅडम व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाखा व्यवस्थापक  उदय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डूबाजी अरसुळे, राजेश कल्याणकर, गायकवाड मॅडम, हर्षद शहा, भरत मोरे, पिराजी गाडे, विनायक पाथरकर तसेच शाखा व्यवस्थापक उदय चौधरी, राजेश्वर देशमुख, प्रकाश कोकरे, सौ. मुधळवाडकर, टाकले यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या