Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाई तांडा येथे उपविभागीय अधिकाऱ्यांनी केला लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ - NNL

गाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार अभियानाची हिमायतनगर तालुक्यातून सुरुवातहिमायतनगर| जिल्हाधिकारी डॉ विपीन यांच्या आदेशानुसार हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाई तांडा येथील तलावातून लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ दि.२० गुरुवारी करण्यात आला. गाळ काढनीमुळे शेत जमीनीची सुपिकता वाढविण्यासाठी मदत होणार असून, तलावात पाण्याचा मुबलक साठा जमा होऊन सिंचन व्यवस्था वाढण्यास मदत मिळणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली.

ते हिमायतनगर तालुक्यातील वाई तांडा येथील तलावातील गाळ काढणीच्या शुभारंभ नंतर बोलत होते. यावेळी त्याच्यासोबत तहसीलदार डी.एन.गायकवाड, मंडळ अधिकारी लक्ष्मण पंगे, तलाठी शिंदे, डॉ.गणेश कदम, तलाठी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात गाळ काढण्यायोग्य ९४ प्रकल्प असून, जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी या सर्व प्रकल्पातील गाळ काढणीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तलावातील गाळ काढण्याच्या यशस्वीतेसाठी लोक सहभागातुन शेतकऱ्यांच्या पुढाकार मिळत असल्याने एक प्रकारे त्या सिंचन व्यवस्थेला पुर्नजीवीत करण्यास बळ मिळाले आहे. हि बाब लक्षात घेऊन “गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार” हा उपक्रम हिमायतनगर तालुक्यात राबविण्यात येत आहे.

गाळ जमा झाल्यामुळे तालुक्यातील पाझर तलाव, गाव तलावात साठवण क्षमतेपेक्षा जास्त पाणी साठून पाझर तलाव, धरण, गाव तलाव फुटण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून शेतकऱ्यांच्या शेतात तलावातील गाळ काढून टाकण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. गाळ काढणीचा कार्यक्रम आगामी १५ दिवसात पूर्णत्वास जाईल. यासाठी शासनाकडून निधी उपलब्‍ध होणार नसल्‍याने व जिल्‍ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातुन हा उपक्रम राबविला जात असल्याचे श्री डापकर यांनी सांगून इतर ठिकाणच्या तलावातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन सिंचन व्यवस्थ वढविण्याच्या कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या