Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतक-याच्या गोठ्याला लागलेल्या आगीत बी-बियाणे खते औषधे भस्मसात - NNL

हदगाव तालुक्यातील मौजे हरडफ येथील दुरदैवी घटनाहदगाव, शे.चांदपाशा| तालुक्यातील मौजे हरडफ येथील शेतकरी कपिल वायवळ यांच्या गोठ्याला आग लागून, त्यामध्ये असलेलं बी - बियाणे, खते - औषधी जाळून खाक झाली आहेत. यात त्यांचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले असून, शासनाने त्यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेतकरी कपिल वायवळ आपल्या शेतात दरोजच्या प्रमाणे शेतातील कामे आटपून घराकडे आले. रात्री अचानक गोठ्याला आग लागली ही आग शेजारी असलेले शेतकरी यांनी रात्री उशिरा बघितली नंतर फोन केला. तोपर्यंत तर सर्व खते बी - बियाणे- व जनावरांचा चारा जळून खाक झाले होते. अगोदरच  शेतकरी लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. तरी पण शेतकरी कपिल वायवळ यांनी खरीप हंगामाची तयारी केली होती. खत बियाणे कीटकनाशकांची खरेदी करून आपल्या शेतात गोठ्यावर नेऊन ठेवले होते.

मृग नक्षत्राचे पाणी झाल्यानंतर व त्यांच्या शेताला जाण्यासाठी रस्ता नसल्याने अगोदरच सर्व साहित्य जमा करून ठेवले होते. परंतु हे नैसर्गिक संकट त्याच्यावर कोसळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यांनी पैशाची जुळवाजुळव करून घरातील दागिने मोडून १७५ खताचे पोते, २० हजार रुपयांची कीटकनाशकांची औषधे, तीन स्पिंकलरचे सट, वर्षभराचे बैलाला पुरेल असे वैरण, ५० पत्राचा शेड व शेतीला लागणारे सर्व अवजारे असे मिळून जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

ऐन पेरणीच्या हंगामात त्यांचे आगीच्या दुर्घटनेत नुकसान झाल्यामुळे यावर्षी त्यांची शेती पडीत पडण्याची वेळ आली आहे. अगोदरच भरमसाठ वाढलेल्या खताच्या किंमतीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामध्ये हे नुकसान म्हणजे शेतकरी चौहू बाजूने होरपळून निघाला आहे. तलाठ्याने या घटनेचा पंचनामा करून शासनाकडून या हंगामासाठी तरी तातडीची मदत द्यावी अशी मागणी केली आहे. पेरणीच्या तोंडावर एवढे मोठे नुकसान झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या