Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दासरी, माला दासरी समाजातील विघार्थाचे जात प्रमाणपत्र,जात पडताळणी देण्यात यावी - प्रा. गंगाधर चेपूरवार -NNL


नांदेड/हिंगोली।
दासरी- माला दासरी समाजातील विघार्थाचे, समाज बांधवाचे जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी योग्य ती दखल घेण्यात यावी या प्रमुख मागणीचे निवेदन प्रातिनिधिक स्वरूपात दासरी माला दासरी समाज बांधवाच्या वतीने दासरी माला दासरी समाज युवक संघटनेचे अध्यक्ष प्रा. गंगाधर चेपूरवार व युवक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा. प्रवीण आल्लडवार, ह्यांच्या हस्ते मा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिनांक 19 मे 2021 रोजी देण्यात आले असून, सदर निवेदनाची एक प्रत प्रतिलिपी स्वरूपात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय नांदेड ह्यांच्या माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीत 40 व्या क्रमांकावर असलेल्या माला दासरी समाजाला आजही उपेक्षित व वंचिताच जीवन जगाव लागत असून, माला दासरी समाज बांधव बाजारात, जत्रा, खेडी, पाडी, वस्ती, तांडा फिरून कुंकू दाशिना, कटलरी गृहोपयोगी सामान,धार्मिक साहित्य सामग्री विकून आपल्या पोटाची खळगी भरतात, माला दासरी समाज आज घडीला शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय अशा सर्वच क्षेत्रात मागासलेला असून, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहे, अनुसूचित जातीत 40 व्या क्रमांकावर असून सुध्दा शासन दरबारी माला दासरी समाजाची पिढ्या न पिढ्या पासुन उपेक्षा केली जात आहे, एकुणच सद्य परिस्थितीत दासरी माला दासरी समाजाची स्थिती फार हालाखिची आहे.

लाँकडाउन मुळे तर बाजार खेडी बंद झाल्याने दासरी माला दासरी समाज बांधवावर उपासमारीची वेळ आलेली असून, त्यातच समाज बांधवाच्या पाल्यांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र या महत्त्वाच्या मुलभूत कागदपत्रापासुन वंचित ठेवण्यात येत आहे, इकडून तिकडून एखाद्या दासरी समाज बांधवाचे जात प्रमाणपत्र निघालेच तर त्या जात प्रमाणपत्रावर पुढे सन. 1950 च्या पुराव्या अभावी जात पडताळणी प्रमाणपत्र तर सोडाच पण जात प्रमाणपत्र रद्द व जप्त करण्यात येते, प्रसंगी गोरगरीब दासरी माला दासरी समाज बांधवाला नाईलाजाने मग कोर्टाची पायरी चढावी लागते.

एकंदरीत पुरोगामी महाराष्ट्रात माला दासरी समाज अनुसूचित जातीत 40 व्या क्रमांकावर असून सुध्दा दासरी माला दासरी समाजाला अनुसूचित जातीचे लाभ मिळत नाहीत, मग किती हा मोठा पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक अन्याय, जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र अभावी विघार्थ्याना समाज बांधवाना शासकीय योजना सोवी सवलती व आरक्षणापासून आज घडीला वंचित राहावे लागत आहे, त्यामुळे दासरी माला दासरी समाजाचे सर्वच बाजूंनी नुकसान होत असून, दरवर्षी दासरी समाजातील विघार्थाचे शैक्षणिक नुकसान तर होतेच होते मग अनुसूचित जाती कोट्यातुन सरकारी नोकरी तर दुरचीच बात, अनुसूचित जातीत 40.व्या क्रमांकावर असून सुध्दा इतकी विवंचना दासरी माला दासरी समाजाला आजही सहन करावी लागते हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

दासरी माला दासरी समाजाला निदान आतातरी शासन दरबारी सामाजिक न्याय हक्क मिळणे गरजेचे आहे.त्यासाठी आता शासनाने दासरी माला दासरी समाजाच्या न्याय हक्क विषयक मागण्याची दखल घेणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र राज्यात दासरी माला दासरी समाज नांदेड, हिंगोली, परभणी व यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो, तसेच महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यात दासरी माला दासरी समाज तुरळक प्रमाणात आढळतो, दासरी माला दासरी समाजाचे आराध्य कुलदैवत भगवान श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी हे असून, श्री नृसिंह जयंती हा दासरी समाजाचा सर्वात मोठा सण आहे, गांवगाड्यात कुंकू व गृहोपयोगी साहित्य सामग्री पोहचविणारा दासरी माला दासरी समाजाचे गांवगाड्यातील ओळख हि "दासरी"-अशी आहे.

दासरी माला दासरी समाजात शिक्षणाचे प्रमाण आजही अत्यल्प असुन, पिढ्या न पिढ्या पासुन बाजार खेडी करून पोटाची खळगी भरण्याच्या चिंतेत असणारा दासरी समाज बांधव सन. 1950 चा जात विषयक महसुली पुरावा आणणार कुठून, त्यातही दासरी समाजातील बोटावर मोजण्या इतक्याच समाज बांधवाकडे शेती असून, खूप मोठ्या प्रमाणात दासरी माला दासरी समाज बांधव पिढ्या न पिढ्या पासुन भुमिहिन आहेत.

मोलमंजुरी करून खाणारे आहेत, अशी एकुणच बिकट अवस्था समाज बांधवाची असुन, शासनाने दासरी माला दासरी समाजा सारख्या मागासलेल्या समाजाची स्थिती समजुन घेऊन सन. 1950 चा महसुली पुरावा नसल्याबाबतचे शपथपत्र ग्राहय धरून दासरी माला दासरी समाज बांधवाना विना टाळाटाळ व विना विलंब जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावे, व शासन स्तरावरून योग्य ती दखल घेण्यात यावी.

या प्रमुख मागणीचे प्रस्तुत निवेदन दासरी माला दासरी समाज युवक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा.प्रवीण आल्लडवार ह्यांच्या हस्ते नियमाचे पालन करून, प्रातिनिधिक स्वरूपात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर देण्यात आले असून, निवेदनावर मा. प्रवीण आल्लडवार, प्रा. गंगाधर चेपूरवार, सौ. अश्विनी अलडवार-चेपूरवार, श्री.रामदास तुकाराम आल्लडवार आदि समाज बांधवाच्या स्वाक्षऱ्या असून, सदर निवेदनावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी आशा दासरी माला दासरी समाज युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.श्री.गंगाधर चेपूरवार ह्यांनी व्यक्त केली असून, येत्या काळात मागणी मान्य न झाल्यास लाँकडाउन नंतर प्रसंगी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर दासरी माला दासरी समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तसेच प्रस्तुत निवेदनानुसार दासरी, माला दासरी समाजातील विघार्थाचे समाज बांधवाचे जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी योग्य ती दखल सदर निवेदनानुसार घेण्यात यावी अशी मागणी दासरी माला दासरी समाज युवक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष व दासरी समाजाचे नांदेड जिल्ह्यातील युवा नेतृत्व मा.प्रवीण आल्लडवार ह्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या