Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हिमायतनगर तालुक्यातील पोट्याजवळ बंद ओमीनी कारवर दरोडा; ऐवज लंपास -NNL


हिमायतनगर|
तालुक्यातील मौजे पोटा गावाजवळ बंद पडलेल्या ओमीनी कारमधून अज्ञात इसमांनी गाडीचं काच फोडून फिर्यादी व त्यांच्या सहकार्यांना बाहेर काढून जबरीने मोबाईल, नागडी रक्कम व लैपटॉप या साहित्याची चोरी केली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, किनवट ते नांदेड जाणारे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पोटा गावाजवळील ३३ केव्ही विद्युभवन येथे, जिवो टावरचे कामकाज करण्यासाठी किनवट येथील किनकी गावात काम आटोपून जात असताना किनवट ते नांदेड रस्त्यावरील हिमायतनगर हद्दीच्या पोटा गावाजवळ दि.२२ रोजी त्याची ओमीनी कार क्रमांक एमएच-31/डीव्ही-7901 हि बंद पडली. त्यामुळे फिर्यादी व त्याचे सोबतचे दोन सहकारी जेवन करुन कारमध्ये झोपी गेले होते.

झोपेत असताना मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास, तीन अज्ञात इसमानी ओमीनी गाडीची काच फोडुन फिर्यादी व त्याचे सहकारी यास कारचे बाहेर काढले. तसेच कारचे डिक्की मधुन नगदी 11,000/-रुपये व एच पी कंपनीचा लॅपटॉप किंमती 10,000/-रुपये, ओपो कंपणीचा मोबाईल किंमती 7000/- रुपये असा एकुण 26,000/-रुपयाचा माल जबरीने चोरुन नेला.

या घटनेने भयभीत झालेल्या आर्शद पि. राजेश वाहाने, वय 26 वर्षे, व्यवसाय चालक व जिवो टावरचे कामकाज रा. मानेवाडा शेषनगर, नागपुर जि. नागपुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हिमायतनगर पोलीस ठाण्यात कलम 392, 427, 34 भादंवि प्रमाणे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपस पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. बालाजी महाजन हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या