Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

किनवट शहर व तालुका कॉंग्रेस कमिटी मास्क वाटप -NNL


किनवट|
शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य मास्क  वाटपाचा उपक्रम व स्वर्गीय खा. राजीवजी सातव साहेब, यांना श्रद्धांजली कार्यक्रम, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. त्यामध्ये सर्व शासकीय कार्यालय, मजूर, कामगार, कर्मचारी व गरजु लोकांना मास्क वाटप करण्यात आले,

यावेळी भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश पाटील भोसीकर, जिल्हा सहकारी बँक संचालिका प्रतिनिधी तथा संचालक भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रामचंद्र मुसळे, किनवट तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुर्यकांत रेड्डी, शहर अध्यक्ष व्यंकटराव नेमाणीवार, किशनराव किनवटकर, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे कोष्षाध्यक्ष नारायणराव श्रीमनवार, माजी नगराध्यक्ष के. मुर्ती, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल सरचिटणीस नविन राठोड,

माजी कॉंग्रेस अध्यक्ष नारायणराव सिडाम, किनवट तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष आशिष कराळे, तालुका कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस गिरीष नेमाणीवार, माजी नगरसेवक लक्षमन दोनपलेवार, शेमशेर कैची, फारूक चव्हाण, महिला शहर अध्यक्ष सौ. कदमताई, शहानाज शेख हुसेन, शहर व तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या