Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हिमायतनगरमध्ये लव्हर्सची गळफास घेऊन आत्महत्या; कामारवाडी येथील घटना -NNL


हिमायतनगर|
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील हदगाव रोडवर असलेल्या मौजे कामारवाडी येथील प्रेमी युगलानी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली आहे. सादर घटना शनिवारी रोज दि.२२ मे च्या रामप्रहरी घडली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलीस निरीक्षक भगवान कांबळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करते आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील दत्ता गणेश भिंगोरे वय २४ व शारदा खंडू माने वय २५ वर्ष रा. चिकाळा हल्लीमुक्काम कामारवाडी यां दोघांमध्ये मागील अनेक दिवसापासून प्रेम संबंध जुळले होते. विवाहित असलेली ती युवती आपल्या पतीसोबत वारंवार होत असलेल्या भांडणामुळे मागील ४ वर्षांपासून कामारवाडी येथे असलेल्या मामाच्या घरी वास्तव्यास होती. यामध्ये या दोघांचे प्रेमसंबंधीची माहिती नातेवाईकांना समजली आणि त्यांनी व दत्ता नामक युवकाच्या घरच्यांनी दोघाच्या प्रेम संबंधाला विरोध होऊ लागला होता. त्यामुळे दत्तांच्या आई-वडिलांनी त्याचे लग्न करण्याचे ठरविले आणि सोयरीकही करण्यात आली होती. 

मात्र दत्ता शारदा सोबत लग्न करण्याच्या विचारात होता. हे लग्न झाले तर शारदसोबत आपले प्रेमसंबंध तुटतील या विवंचनेत तो होता. याच विवंचनेत दोघांनी एकमेकांना भेटून टोकाचे पाऊल उचलले. आणि शनिवारी पहाटच्या रामप्रहरी गांवालागत असलेल्या वानखेडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सकाळी उघडकीस येताच कामारवाडीचे पोलिस पाटील नागोराव भिंगोरे यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्याला माहिती देतच तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल हजार झाले. आणि या प्रेमीयुगलाच्या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या घटनेचा स्पॉट पंचनामा करून दोघांचे प्रेत हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दुपारी उशिरा या दोघांनाचे अंत्यसंस्कार करण्यात आले.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या