Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाची धडाकेबाज कार्यवाही; फक्त २ ट्रैक्टर पकडले -NNL

रेती, मुरूम, दगडसारख्या गौण खनिजाची चोरी करू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणलेहिमायतनगर| विदर्भ - मराठवाड्याच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरून वाहणाऱ्या कामारी, विरसनी, दिघी, कोठा, कोठा तांडा, वारंगटाकळी, धानोरा, बोरगाडी तांडा, एकंबा, पळसपूर आदी ठिकाणाहून रेतीची रात्रंदिवस चोरी केली जात आहे. याबाबतचे वृत्त मागील १५ दिवसापासून प्रकाशित होत असल्याने अखेर याची जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दाखल घेऊन कार्यवाहीचे आदेश देताच दि.२८ च्या रामप्रहरी महसूलच्या पथकाने रेती भरून वाहतूक करणारे फक्त २ ट्रैक्टर पकडून पोलीस ठाण्यात लावले आहेत. या कार्यवाहीमुळे रेती, मुरूम, दगडसारख्या गौण खनिजाची चोरी करू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पैनगंगा नदीकाठावर असलेलता रेती धक्क्यावरून अनधिकृतपणे उत्खनन करून राजकीय वरदहस्त असलेले शेकडो ट्रैक्टर चालक - मालक स्थानिक महसूलच्या नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व काही पोलीस पाटीलच्या संगनमताने शासनाला चुना लावण्याचे काम मागील दसरा- दिवाळीपासून करत आहेत. याबाबत नांदेड न्यूज लाईव्हने आत्तापर्यंत ३० ते ३५ बातम्या प्रकाशित केल्या. बातमी प्रकाशित होताच जुजबी कार्यवाही कार्याची आणि पुन्हा रेती माफियांना रान मोकळं सोडायचा हा नित्याचाच प्रकार सुरु झाला. दरम्यान रेती तस्करीबाबत स्थानिक भाजप कार्यकर्ते, मराठा सामर्ज्या संघ, पत्रकार संघ, काही शिवसैनिक व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविला. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या महसूल प्रश्नातील काहीजणांनी खाबुगिरीचा कित्ता गिरवीत शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली. त्यामुळे माफियांनी निडर होऊन दिवस रात्र नदीकाठावरील सर्वच रेती घाटावरून कोट्यवधी ब्रास रेतीची चोरी करून रान, शिवार, गाव, प्लॉट, बांधकाम, गायरान जमीन, यासह हिमायतनगर शहर परिसर अश्या जमेल त्या ठिकाणी साठेबाजी केली.जर जिल्हा प्रशासनाला खरोखरच शासनाच्या महसूलमध्ये वाढ करावयाची असेल तर हिमायतनगर - उमरखेड पैनगंगा नदीकाठावरील प्रत्येक गावात आणि रान शिवारात कोणालाही न सांगता अचानकपणे ड्रोन कैमेऱ्याद्वारे चित्रीकरण केल्यास कुठे किती ब्रास रेतीचा साठा करण्यात आला हे दिसून येईल. त्यातही काही कळले नाहीतर हिमायतनगर तालुक्यात ज्या जय ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले त्या कैमेऱ्याचे मागील ६ महिन्यातील डेटा चेक करून विनापरवाना रेती भरून वाहतूक करणारे, ट्रैक्टर, टिप्पर, निदर्शनास येतील. यावरून तरी निधन पत्रकारांनी लिहिलेल्या बातम्या सत्य कि असत्य हे कळेल. तसेच पैनगंगा नदीला राजकीय वरद हस्ते असलेल्या या रेती माफियांनी कश्या प्रखर पोखरून काढले हे दिसून येईल. रेती माफियांच्या माजलेल्या धुमाकुळामुळे पैनगंगा नदीतील पाणी पातळी खोलवर गेली असून, यावर अवलंबून असलेल्या अनेक गावच्या नळयोजना मागील ४ महिण्यापासून बंद पडल्याने नागरिकांना पशु पक्षी व प्राण्यांना थेंबभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. यास फक्त आणि फक्त रेतीचे अवैद्य उत्खनन जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया रेती उत्खननास विरोध असलेल्या अनेक गावच्या सरपंच बांधवांतून केला जात आहे.

दरम्यान मागील आठ दिवसापूर्वी कट्टर शिवसैनिक तथा खा.हेमंत पाटील यांचे समर्थक रामभाऊ गुंडेकर यांनी रेती घाटाच्या चौकशीसाठी आमरण उपोषणाचा इशारा देताच नदीकाठावरील रेतीसाठे जप्तीचा कामाला कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या सूचनेने सुरुवात झाली. दिघी, धानोरा, बोरगडी, कोठा भागात अनेक रेती साठे जपत करण्यात आली, मात्र यातही मोठ्या प्रमाणात हालचाली होऊन बहुतांश रेतीसाठे माफियांना उचलण्यास हितसंबंध असलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यानि सांगितले हे शहर व ग्रामीण भागात ट्रैक्टरद्वारे रेती आणून टाकून स्वार्थ साधला आहे. अशी माहिती कार्ला, सिबदरा, धानोरा, वारंगटाकळी, दिघी, खडकी, सरसम, जवळगाव, सिरंजनी, शेलोडा, पळसपूर, डोल्हारी, मंगरूळ आदी भागातील गावकर्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्या वार्ताहरांशी बोलतांना दिली आहे.


हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातून नेहमी प्रकाशित होणाऱ्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी जिल्ह्यातील नदीपात्रालगतच्‍या शेतजमिनीत किंवा इतर ठिकाणच्‍या शेतीजमिनी तसेच महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात बांधकामाच्‍या ठिकाणी अवैध रेतीसाठे कुणाला आढळल्यास अशा शेतकऱ्यांनी किंवा खाजगी जमीन मालकांनी त्‍यांच्या जमिनीत केलेल्‍या अवैध रेतीसाठयाची माहिती संबंधीत कार्यक्षेत्रातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना तात्‍काळ कळवावी, जिल्ह्यातील जप्‍त रेतीसाठ्याच्‍या लिलावाच्‍या अनुषंगाने करावयाची कार्यपध्‍दती निश्‍चीत करण्‍यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत लिलाव झालेला नसून कोणी जर नदीपात्रालगतच्‍या शेतीमध्‍ये मोठया प्रमाणात अवैध रेतीसाठे करीत असतील तर त्यांच्या कठोर कारवाई करू असे निर्देश दिले आहेत.

यावरून हदगावचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी त्यांच्या विशेष पथकाने हिमायतनगर तालुक्यात फक्त दोन रेतीचे भरलेले ट्रॅक्टर पकडून धडक कारवाई केली. ते ट्रेक्टर हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये लावले असून, या वाहनधारकांनी शासनाच्या नियमाप्रमाणे १ लक्ष १३ हजारच प्रत्येकी दंड भरला नाहीतर त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही होणार आहे. एकूणच या कार्यवाहीमुळे हिमायतनगर शहरातील व ग्रामीण भागातील रेती माफियांचे धाबे दणाणले असले तरी अजूनही अनेक ठिकाणी चोरीच्या मार्गाने रेतीची वाहतूक करून गरजूना अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात असल्याचे आणि करण्यात आलेल्या साठेबाजीचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. यानंतर महसूल प्रशासन नदीकाठावरील रान-शिवारात आणि गावखारी करण्यात आलेल्या रेतीसाठ्यावर कशी कार्यवाही करणार हे पाहावे लागणार आहे.

जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाची हिमायतनगरात अंमलबजावणी होईल का..?सर्व ठिकाणच्या बांधकामाच्‍या ठिकाणी वापरण्‍यात येत असलेल्‍या रेतीबाबत संबंधीत तहसिलदार यांचेमार्फत नायब तहसिलदार व मंडळ अधिकारी यांची पथक गठीत करुन तपासणी करण्‍यात येईल. ज्‍या शेतकऱ्यांनी किंवा खाजगी जमीनधारकांनी अशा प्रकारचे अवैध रेतीसाठे असल्‍याची माहिती जिल्‍हा प्रशासनास कळविणार नाहीत. अशा शेतकरी, खाजगी जमीन मालकाविरुध्‍द महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम, 1966 मधील कलम 48 मधील पोट कलम (7) नुसार दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात येईल. या दंडात्‍मक रक्‍कमेचा बोझा संबंधीताच्‍या जमिनीवर घेण्‍यात येईल याची संबंधीतानी नोंद घ्‍यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी कळविले आहे. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाची हिमायतनगर तालुक्यात महसुलाचे अधिकारी कितपत अंमलबजावणी करतील हे आता पाहावे लागणार आहे.

रेतीच्या माध्यमातून होणारी लूट थांबविण्यासाठी ठोस पाऊले उचलायला हवेत..!नेहमी जनतेच्या हितासाठी बेंबीच्या देठापासून ओरडणारे राजकीय नेते या रेतीचोरीच्या प्रकरणावरून का चूप आहेत. या रेतीचोरीच्या माध्यमातून गोरगरीब घरकुल लाभधारकांना मोठ्या प्रमाणात लूट होत असताना का..? चूप बसले आहेत असा प्रश्न गोरगरीब जनतेला पडलेला आहे. कारण शासनाकडून मिळणाऱ्या घरकुल बांधकामाच्या निधीतील अर्धी रक्कम रेती खरेदीसाठी खर्च करावी लागते आहे, त्यामुळे व्याजी दिडी काढून स्वप्नातील घरकुलाचे काम पूर्ण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांना रक्कम उसनवारी मिळली नसल्याने घरकुलाचे काम अर्धवट आहे. शासनाने घरकुल धारकांना मोफत ५ ब्रास रेती देण्याचे जाहीर केले मात्र प्रत्यक्षात किती घरकुल धारकांना मोफत रेतीचा फायदा झाला. यासह अनेक प्रश्न लाभार्थ्यांपुढे उभे आहेत, त्यामुळे शासन प्रशासन गोर गरिबांची रेतीच्या माध्यमातून होणारी लूट थांबविण्यासाठी ठोस पाऊले उचलायला हवे अश्या संतप्त प्रतिक्रिया रेती माफियांच्या लुटमारीला बळी पडलेल्या लाभार्थ्यांमधून पुढे येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या