Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात आणखी एका ऑक्सीजन प्लँटची उभारणी -NNL

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यशनांदेड| कोवीड संक्रमणाच्या काळात नांदेड जिल्ह्यातील आरोग्यसेवा मजबूत करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. राज्य शासनाचा निधी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारणीसाठी मंजूर करून घेतला. यातील पुढील भाग म्हणून केंद्र शासनाच्या निधीतून जिल्ह्यासाठी आणखी एका ऑक्सीजन प्लँटची मंजुरी मिळाली असून यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कामी आले आहेत.

देशातील विविध शहरामध्ये पी.एम.केअर फंडातून ऑक्सीजन प्लँटची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. हे ऑक्सीजन प्लँट उभारणीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडेे देण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे प्रमुख व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पाठपुरावा करून नांदेड जिल्ह्यासाठी आणखी एका ऑक्सीजन प्लँटची मंजुरी मिळवून घेतली आहे. हा ऑक्सीजन प्लँट येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यान्वित होणार आहे.

शहरामध्ये आणखी एका ऑक्सीजन प्लँट उभारल्यानंतर कोवीड रुग्णांसाठी लागणार्‍या ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यापूर्वीही ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. राज्य शासनासोबतच केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून त्यांनी या प्लँटची मंजुरी मिळविली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या