Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पळसपूरच्या लालची तलाठ्याने सातबारावरील वारसाचे नाव काढून टाकले - NNL

कार्ला पी येथील रामराव पाटील यांनी केला आरोप हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पळसपूर येथील तत्कालीन तलाठी श्री माने यांनी पैशाची मागणी पूर्ण केली नसल्याने सातबारावर असलेल्या चिमुकल्या वारसाचे नाव उडविले आहे. या प्रकारची चौकशी करून त्या तलाठ्यावर फसवणुक आणि लाच मागणीचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी कार्ला पी. येथील जेष्ठ नागरिक रामराव पाटील यांनी केली आहे. या संबंधी त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कार्ला पी.येथील रामराव पाटील यांच्या कन्येचा विवाह पळसपूर येथील अवधूत वानखेडे यांच्यासोबत झाला होता. त्यांच्या सुखी संसारात कन्यारत्न कु.राणी ने जन्म घेतला. त्यांनतर अवधूत वानखेडे हे मागील ९ वर्षांपासून बेपत्ता झाल्याने तिच्या व तिच्या आईच्या पालन पोषणाची जबाबदारी आजोबा रामराव पाटील कार्लेकर यांचावर आली. काहीवर्षे वाट पाहूनही चिमुकलीचे वडील आले नसल्याने तीच्या पालन पोषण आणि वारसा हक्क म्हणून तिच्या वडिलांच्या नावे असलेली गट क्रमांक ४२४ क्षेत्र २४ आर हि जमिन गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी दिलेल्या निर्णयावरून वारस आणि इतर अधिकारांमध्ये कु.राणी अवधूत वानखेडे हीच नाव सातबारावर लावण्यात आले होते. त्यानंतर मागील काही महिन्यापूर्वी पळसपूर सज्जा येथे कार्यरत असलेले आणि सध्या बदली करून गेलेले तलाठी श्री माने यांनी कुणाच्यातरी सांगण्यावरून सातबारावर वारसा मानून  असलेल्या राणी अवधूत वानखेडे हिचे नाव सातबारावरून (गायब) काढून टाकले केले आहे. 

हा प्रकार सेतुकेंद्रावरुन ७/१२ काढणल्यानंतर रामराव पाटील कार्लेकर यांच्या लक्षात आला. त्यावरून यांनी तलाठी माने यांची भेट घेऊन नाव का काढलं गेलं, पूर्ववत सातबारावर वारसाचे नाव नोंदवावे अशी विनंती केली. यावेळी खाबुगिरीची सवय जडलेल्या माने नामक तलाठी महाशयांनी रामराव पाटील यांच्याकडे १० हजारांची मागणी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मागणीची रक्कम देऊन शकलो नसल्याने त्यांनी माझ्या नातीचे नाव सातबारावरून दुसऱ्या कुणाच्यातरी सांगण्यावरून जाणीपूर्वक वगळून टाकले असल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. 

तसेच तत्कालीन तलाठ्याने केवळ पैश्याच्या लालचेने माझ्या नातीचे नाव सातबारावरून काढून टाकून येथून बदली करून घेतली आहे. एवढेच नाहीतर हा तलाठी मागील अनेक वर्षांपासून पळसपूर सज्जामध्ये कार्यरत असताना विविध वादग्रस्त कामे केली आहेत. त्याने रेती माफियांशी मिलीभगत करून शासनाच्या महसुलावर डल्ला मारला होता. त्यामुळं या भागात रेती माफियांनी उच्छाद मांडला हे अनेकदा प्रकाशित झालेल्या बातम्यांवरून स्पष्ट होते. त्यामुळे श्री माने तलाठी यांची खातेनिहाय चौकशी करावी आणि सातबारावर पुन्हा लावण्यासाठी केलेल्या लाच मागणी वरून वारसाचे नाव काढून फसवणूक केल्याबद्दल पोलिस कार्यवाही करावी. आणि माझ्या नातीचे सातबारावरून काढलेलं नाव पूर्ववत वारसा म्हणून लावून न्याय द्यावा अशी मागणी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.    टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या