Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नांदेड जिल्ह्यात 44 व्यक्ती कोरोना बाधित; एकाचा मृत्यू, तर 97 कोरोना बाधित झाले बरे -NNL


नांदेड|
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 691 अहवालापैकी  44 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 16 तर अँटिजेन तपासणीद्वारे 28 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 870 एवढी झाली असून यातील 87 हजार 872 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

आजच्या घडीला 564 रुग्ण उपचार घेत असून 8 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दि. 11 जून 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे हदगाव येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 895 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 12, किनवट 1, हदगाव 1, लोहा 1 उमरी 1 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 14, हदगाव 1, मुखेड 1,  नांदेड ग्रामीण 3, कंधार 1, नायगाव 1, भोकर 1, लोहा 1, हिंगाली 2, देगलूर 1, मुदखेड 1, लातूर 1  असे एकूण 44 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 97 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 4,  मुखेड कोविड रुग्णालय 3,  हिमायतनगर तालुक्यातर्गंत 3, बारड कोविड केअर सेंटर 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, देगलूर कोविड रुग्णालय 2, माहूर तालुक्यातर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 58, किनवट कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 18 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 622 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  29, लोहा कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 1,किनवट कोविड रुग्णालय 17, देगलूर कोविड रुग्णालय 6,   हदगाव कोविड रुग्णालय 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 349, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गह विलगीकरण 105, खाजगी रुग्णालय 33 व्यक्ती उपचार घेत आहेत. आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 116, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 128 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 70 हजार 954

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 68 हजार 624

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 870

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 872

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 895

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.70 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-198

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 564

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-8 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या