Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हिमायतनगरात भुसार दुकानाचे शटर वाकवून धाडसी चोरी -NNL

चोरटयांनी काउंटर उचलून नेऊन केली लाखोंची रक्कम लंपास हिमायतनगर, अनिल मादसवार| किनवट- नांदेड राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर शहरातील उमरचौक भागातील शंकर ट्रेडिंग कंपनी या दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. एवढेच नाहीतर चोरटयांनी काउंटरचे कुलूप निघत नसल्याने चक्क काउंटर उचलून नेऊन नाल्याच्या बाजूला फेकून नगदी रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना दि.१० गुरुवारी मध्यरात्रीला घडली आहे.हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, येथील पोलीस स्थानकात पीआय, एपीआय, पीएसआय, आणि पोलीस स्टाफ कार्यरत आहे. असे असताना देखील मागील काही दिवसापासून  रात्रगस्तीच्या फेऱ्या कमी होत असल्याने चोरट्याने व्यापाऱ्यांच्या दुकानाकडे लक्ष केंद्रित केले आहे. मागील महिन्यात राष्ट्रीय महामार्गावरील साईनाथ कोमावार यांच्या दुकानाचे शटर वाकवून रक्कम लंपास केली होती. त्या घटनेचा तपास लागला नसताना पुन्हा त्याचं दुकानाच्या समोर असलेले सिरंजनी येथील अविनाश संगणवार या युवकाच्या शंकर ट्रेडिंग कंपनी नावाने असलेल्या दुकानाचे शटर वाकवून मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी धाडसी चोरी केली आहे.नित्याप्रमाणे रात्रीचे ८ वाजता दुकान बंद करून व्यापारी संगणवार हे गावाकडे गेले होते. बुधवारी त्यांच्या दुकानात झालेल्या व्यवहाराचे पैसे काउंटरमध्ये असल्याची संधी साधून प्रथमताः चोरटयांनी शटर समोरील सीसीटीव्ही कैमेऱ्याचे तोंड फिरवून शटर वाकविले. आणि आता प्रवेश केला बरच वेळ काउंटचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न असफल होत असल्याने चक्क येथील काऊंटरचा पळविले. हा सर्व प्रकार दुकानाच्या आतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. चोरटयांनी तोंडाला मास्क आणि अंगात काळे कपडे परिधान केल्याचे दिसून आले आहे. शहराच्या कडेला असलेल्या वॉर्ड क्रमांक १६ च्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याजवळ नेऊन काउंटरची तोडफोड करून त्यात असलेली लाखोंची नगदी रक्कम लंपास केली आहे. त्या काउंटरमध्ये असलेले आधार कार्ड, बैंक खाते बुक, चेक बुक इतर कागदपत्रे फेकून देऊन नासधूस केल्याचे दिसून आले आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भगवान कांबळे, जमादार बालाजी लक्षटवार यानी भेट देऊन तपासणी केली, तसेच दुकानाच्या आतील सीसीटीव्ही फुटेज पाहून स्वानं पथक व ठसे तज्ञांच्या टीमला पाचारण केलं. सकाळी १० वाजता पथक प्रमुख एच.सी. आयुब खान, एच. सी. पाटील, चालक नागरगोजे, श्वान ब्राऊनी, ठसे तज्ज्ञ प्रमुख डी. के. भुरे, एन.पी.सी. मुलमवाड, पीसी बोराळे दाखल झाले. यांनी सेवनास सुगंध देऊन तपास केला असता रात्रीला झालेल्या पावसामुळे अज्ञात चोरट्यांचा मग काढता आला नाही. घटनेचे गांभीर्य घेऊन दुपारी उपविभागीय अधिकारी जि.जि.राजनकर यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. तसेच या चोरीच्या घटनेच्या तपासासाठी पथक तैनात करून तातडीने चोरट्याने गजाआड करावे अश्या सूचना त्यांनी दिल्या. या संदर्भात हिमायतनगर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी प्रतिष्ठित व्यापारी महाविरचंद श्रीश्रीमाळ, रफिक सेठ, राजू बंडेवार, नाथा पाटील, साईनाथ कोमावार, मसूद भाई, पत्रकार अनिल मादसवार, अनिल नाईक, आणि अनेक व्यापारी नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी या चोरीच्या घटनेचा गांभीर्याने व लवकरात लवकर तपास करून, पोलिसानी रात्रगस्तीत वाढ करावी आणि व्यापाऱ्यांसह शहरवासीयांना चोरटयांपासून सुरक्षा द्यावी अशी मागणी केली. एकूणच आजच्या चोरीच्या घटनेवरून शहरातील व्यापारी बांधत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दुकानात चोरी करून रक्कम पळविण्यामागे कुणीतरी माहितीगार व्यक्तीचा हात असावा व चोरटे किनवट येथील असावे असा संशय अनेकांनी पोलिसांशी बोलताना व्यक्त केला. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या