Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोटा बु.येथील उपआरोग्य केंद्रातील ओपीडी चालू करा - संतोष पुलेवार -NNL


हिमायतनगर|
सरसम बु.प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या तालुक्यातील मौजे पोटा बु,येथील उपआरोग्य केंद्रातील ओपीडी चालू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक संतोष पुलेवार यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व तालुका आरोग्य अधिकारी संदेश पोहरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

नांदेड- किनवट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सरसम बु.प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तालुक्यातील मौजे पोटा बु,येथील उपआरोग्य केंद्र आहे. येथील आरोग्य केंद्र ए परिसरातील वाडी, तांडे आणि लहान गाव अश्या १० ते १५ हजार लोकसंख्येच्या सुविधेसाठी बनविण्यात आलेलं आहे. या भागातील जनतेला आरोग्य सुविधेसाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. मात्र ते आठड्यातून दोन वेळा भेट देतात  त्यामुळे इतर आरोग्य कर्मचारी येथे वेळेवर हजार न होता आपल्या मर्जीप्रमाणे कामावर येत असल्याने गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे येथे रुग्णांची हेळसांड होत असून, नाईलाजास्तव रुग्णांना भोकर - हिमायतनगर येथील खाजगी दवाखान्यात महागडा उपचार घेण्यासाठी जावं लागते आहे.

हे सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्याला परवडणारे नसून, यामुळे शासनाच्या मोफत आरोग्य सुविधेचा लाभ मिळत नसल्याने आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो आहे. हि बाब लक्षात घेता पोटा बु.येथील उपआरोग्य केंद्रात सर्व सोइ - सुविधा उपलब्ध करून देऊन बाह्यरुग्ण सेवा म्हणजे ओपीडी सुरु केल्यास जनतेची होणारी आर्थिक लूट व हेळसांड थांबेल. हि बाब लक्षात घेता तात्काळ येथे ओपीडी सुरु करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक संतोष पुलेवार यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या