Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अर्धापुरात खैरगाव पाटीजवळ ट्रॅक्टर उलटून सरेगाव येथील दोन तरुण जागीच ठार - NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
भोकरफाटा  - बारड रस्त्यावरील खैरगावपाटी जवळील कॅनाॅल जवळ ट्रॅक्टर उलटून झालेल्या आपघातात दोघे ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता चार) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाली आहे.या आपघातातील मयत हे सरेगाव (ता मुदखेड) येथील आहेत.या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालका विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.या अपघातात ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाला आहे.

या बाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती आशी  की , भोकर फाटा - बारड रस्त्यावरील खैरगावपाटी परिसरातील तुकाराम पेट्रोल पंपाच्या समोरील कच्च्या रस्त्यावरून   ट्रॅक्टर जात आसतांना आचनकपणे  ट्रॅक्टर उलटून आपघात झाला .या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून तुषार सुर्यभान कळने (वय 15 रा सरेगाव ता मुदखेड) व पुरभाजी मारोतराव गिरे (वय 24) यांचा जागीच मृत्यू झाला.

या आपघाताची माहिती मिळतातच  बारड महामार्ग सुरक्षा पथकाचे  शेख,स्वाधीन ढवळे , संतोष वागतकर ,आमोल सातारे  हे   घटनास्थळी दाखल झाले .नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टरला क्रेनच्या साहाय्याने सरळ केले.या प्रकरणी तेजस गिरी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल झाला आहे.

खरिपाच्या पेरणी जवळ आल्यामुळे शेतीची मशागतीचे कामे सुरू आहेत.ट्रॅक्टरने नांगरने ,शेत साफ करणे आदी कामें करण्यात येतात.शेतीकामाठी वापरत येणारे ट्रॅक्टर उलटून हा आपघात  झाला आहे.तसेच अधूनमधून पाऊस ही येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या