Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासकिय कामात अडथळा केल्याप्रकरणी सवना ज. येथील एकावर गुन्हा दाखल - NNL


नांदेड/हिमायतनगर|
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाला धक्काबुक्की करुन शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा केल्याप्रकरणी दि.०३ गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनि दिलेल्या माहितीनुसार, हिमायतनगर तालुक्यातील सवना ज.येथे गुरुवारी (ता. तीन जून) रोजी सायंकाळी एका शेताच्या प्रकरणात सायंकाळी ६ विजेच्या सुमारास बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिस पथकाला आरोपी धोंडू किसन राऊत (वय ३५) रा. सवना ता. हियामायनतगर याने वाद घातला. तुम्ही आमच्या गावात कसे काय..? आलात, तुम्हाला शेती मोजण्याचा अधिकार आहे का..? या कारणावरुन अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

तसेच तुम्हा पोलिसांना कापून टाकतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. आणि पोलिस गाडीसमोर येऊन गाडी अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलिसांशी धक्काबुक्की केली. या प्रकरणी महिला पोलीस हवालदार कोमल कागणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हिमायतनगर पोलिस ठाण्यात धोंडू राऊत यांच्याविरुद्ध कलाम ३४१, ३५३, २९४,४०६, भादवी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकते व त्यांचे सहकारी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या