Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अर्धापुर तालुक्यातील देळुब (बु) येथे होणार चंदणाची शेती -NNL


अर्धापुर, निळकंठ मदने|
तालुक्यातील देळुब(बु) येथील तिन शेतकऱ्यांनी चंदन लागवडीसाठी नोंदणी केली असून, माती परीक्षणासाठी अहवाल सबंधीताकडे पाठविला आहे.चंदनाच्या शेतीकडे शेतकरी आकर्षीत झाले आहेत.

अर्धापुर तालुक्यातील देळुब(बु) येथील सरदार खान पठाण,भीवाजी जळबाजी थोरात, मजीदखान पठाण, नूरखान पठाण यांच्यासह सात शेतकऱ्यांनी चंदनाची शेती करण्यासाठी नोंदणी करुन माती परीक्षणासाठी अहवाल पाठवून दिला आहे.८ जून ला देळुब येथे राट्रीय शाश्वत शेती अभीयाना अंतर्गत शासनमान्य चंदन शेतीसाठी शेतकऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी बाबूराव डोणगावकर,जिल्हा व्यवस्थापक जी आर इंगळे,सौ.दिपाली सुर्यवंशी, सौ.सराडे,सौ.पांचाळ यांची उपस्थिती होती.यावेळी शेतकऱ्यांनी पाहुण्यांना वृक्ष देऊन स्वागत केले.

यावेळी १२ फुटावर चंदनाच्या झाडाची लागवड करण्यात येणार असून,अंतर्गत पीक घेता येते ही जमेची बाजू असून,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार असल्याची माहिती यावेळी अधीकाऱ्यांनी दिली.यावेळी लाखो रुपयांचे उत्पन्न चंदनापासून मिळणार आहे.याविषयी मार्गदर्शनासाठी ९९७००४४७७१ शेतकऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या