Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना महामारीने ऑक्सिजनचं महत्व जगाला दाखवून दिले - पोनी.भगवान कांबळे - NNL

५० वृक्षलागवड करून पोलिसांनी केला जागतिक पर्यावरण दिन साजरा हिमायतनगर, अनिल मादसवार| मनुष्य जीवनात ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे कोरोना महामारीने जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड आणि संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असून, यामुळं  नक्कीच पर्यावरणाचा समतोल स्थिरावून मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध होईल. असा आशावाद पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी व्यक्त केला. येथील पोलीस स्थानक व वसाहतीत दि.०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५० वृक्षाची लागवड करून वृक्ष संगोपनाची जबाबदारी देण्यात आली. वृक्ष लागवडीचा शुभारंभ केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. 

यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक भगवान कांबळे म्हणले कि, पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या, संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरण समतोल अबाधित ठेवणे, पोषक वातावरणाची निर्मिती करणे, यासाठी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जातो. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी या उपक्रमात सहभागी होतात. मात्र होणारी बेसुमार वृक्ष तोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडट चालला आहे. २०१९ मध्ये उदभवलेल्या कोरोना महामारीने सर्वाना करून देण्यासाठी मृत्यूच्या दारात नेऊन ठेवले होते. यास कारणीभूत ठरली वातावरणातील ऑक्सिजनची कमतरता यामुळे जगातील जवळपास सर्व वैद्यकीय चिकीत्सा आणि हॉस्पिटल गत वर्षभरापासून ऑक्सिजन उपलब्धतेच्या तणावाखाली राहिली आहे. 


त्यामुळे आता प्रत्येकाला शुद्ध हवेचे मोल लक्षात आले आहे. कोविड-19 सारख्या आजाराने जो त्याच्या तावडीत सापडला, त्याच्या श्वसन यंत्रणेवर, फुफ्फुसावरच घाला घालून कोरोना मोकळा झाला. लाखो लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. ज्या श्वासावर आपले जीवन सुरू असते ती श्वासाची प्रक्रिया प्रत्येकाचे शरीर सुरु ठेवण्यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन करून पर्यावरण अबाधित ठेवणे महत्वाचे झाले आहे. याची जाणीव सर्वाना व्हावी म्हणून पर्यावरण दिनी प्रत्येकानी किमान एक वृक्ष लाऊन त्याची जोपासना करणे अनिवार्य असल्याचे श्री कांबळे म्हणाले.
याचं पार्श्वभूमीवर हिमायतनगर पोलिसांनी दि.०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाण्यात आणि पोलीस वसाहतीत वृक्ष लागवडीची तयारी केली. यासाठी इस्लापूर येथील रोपवाटिकेतून वृक्ष आणण्यात आली असून, त्या वृक्षाच्या लागवडीसाठी २ फूट खोल खड्डे तयार करून लागवड करत प्रत्येकाला वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी सोपवीण्यात आली आहे. यामुळे नक्कीच पर्यावरणाचा समतोल स्थिरावून मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, जमादार बालाजी लक्षटवार, जमादार हेमंत चोले, जमादार रमेश कांबळे, जमादार सुधाकर कदम, डीएसबीचे अविनाश कुलकर्णी, राजेश घुन्नर, नारायण मेंडके, प्रकाश जाधव, ज्ञानेश्वर बास्टेवाड, जेष्ठ पत्रकार असद मौलाना, सय्यद मन्नान भाई, अनिल मादसवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, अनिल नाईक, यांच्यासह सर्व पोलीस स्टाफ व नगर पंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या