Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सिडको महाराणा प्रतापसिंह पुतळा परिसरात विघुत खांब लाऊन लाईट चालू करा - NNL


नविन नांदेड|
सिडको येथील महाराणा प्रतापसिहं यांच्या पुतळा परिसरातील जयंती पूर्वी लाईट खांब बसविणे व पुतळा परिसरात लाईट व्यवस्था  करण्याबाबत आज विश्व् हिंदु परिषद बजरंग दल नांदेड तर्फे नांदेड शहर महा नगर पालिकेचे आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात, सिडको परिसरातील विरशिरोमणी महाराणा प्रताप सिंह पुतळा परिसरात लाईट नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे,१३ जुनं रोजी महाराणा प्रतापसिंह यांच्यी जयंती असल्याने पुतळा परिसरात विघुत खांब बसवुन चार ही बाजुने एल,ई,डी लाईट बसवावे अशी मागणी विश्व हिंदू परिषद चे जिल्हा मंत्री शशीकांत पाटील,महानगर मंत्री गणेश कोकुलवार,बंजरगदल स्हसंयोजक गजाननसिंह चंदेल यांच्यासह अक्षय पाटील,मोनु जोशी, गोविंदसिंह ठाकुर, गौरव वाळींबे, राज पाटील सुर्यवंशी,महेश सुर्यवंशी, शुभम गोपीनवार, यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या