Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फोन लावतो म्हणून व्यापा-याचा मोबाईलच लपांस केला -NNL

हादगावमध्ये मोबाईल चोरटाच पैशाची मागणी करु लागलाहदगाव, शे.चांदपाशा| एक काँल करु दया... म्हणुन एका छोट्या रेडीमेड कापड विकणा-या व्यापा-याचा एका व्यक्तिने मोबाईल घेतला. व्यापारी ग्रहकांना बोलण्यात गुंग असल्याचे पाहताच तेथुन तो व्यक्ती पळुन गेला. जेव्हा त्या व्यक्तीला फोन लावला तर चक्क तो पैशाची मागणी करु लागला. या बाबतीत मोबाईल धारकाने पोलिस स्टेशनला तक्रार दिली असुन, जर त्याच वेळी पोलिसांनी या बाबतीत थोडा जरी चाणक्षपणा दाखविला असता तर तो मोबाईल चोरटा सापडला आसता. गरीब कापड व्यापा-याचा मोबाईल मिळाला असता.

या बाबतीत माहीती अशी कि, शहरातील हनुमान परिसरात मो. हुजेफ मौ. रफी हा युवक हा हनुमान परिसरात रेडीमेड कापड विकतो. दि ५ जुन २०२१ रोजी एक व्यक्ती आला व मला अर्जट एक काँल करायच आहे म्हणुन त्या व्यापा-य कडुन मोबाईल घेतला. व्यापारी ग्रहकाना बोलत असतांना त्या व्यक्तीने लगेच या संधीच फायदा उचलला व तेथुन तो गायब झाला. काही वेळातच ह्या व्यापा-याच्या  लक्षात आले की, ज्या व्यक्तीला मोबाईल दिले तो व्यक्ती दिसेनासा झाल्याने त्या व्यक्तीचा शोधाशोध केली आसता तो दिसुन आला नाही. 

जो मोबाईल घेवुन गेला त्या मोबाईलवर काँल केले आसता तो व्यक्ती चक्क पैशाची मागणी करु लागला. नंतर या बाबतीत हदगाव पोलिस स्टेशनला या बाबतीत सुचना दिली असता प्रथम तर तक्रार घेण्यासाठी टाळटाळ झाली. यामध्ये बराच वेळ तक्रारकर्त्याचा वाया गेला. जर लगेच हदगाव पोलिसांनी कार्यत्परता दाखवली आसती तर मोबाईल चोरटा सापडला असता. विशेष म्हणजे लाँकडाऊन लागण्याच्या पुर्वी दर शुक्रवारी शहरात आठवडी बाजार भरत असतो. दर शुक्रवारी बाजार करायला आलेल्याचे मोबाईल चोरीला जातात. पण पोलिस माञ हरविल्याची नोंदी घेत नसल्याने पण आता मोबाईल चोरीला गेला तरी कोणी तक्रार करित नाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या