Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे पेट्रोल पंपावर आंदोलन -NNL

महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले हिमायतनगर| केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. पेट्रोलने १०१ रुपया लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास जास्त दिवस लागणार नाही. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. 

आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत असल्याने. केंद्र सरकारच्या दरवाढी विरोधात दि. ७ सोमवारी येथिल पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्या कडुन आंदोलन करण्यात येवुन दरवाढीचा निषेध व्यक्त करत सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.

ग्रामिण भागात पेट्रोलवर चालनारी सर्वाधिक वाहने आहेत प्रामुख्याने दुचाकी ही प्रवासाचा अविभाज्य भाग आहे, आता इंधन दरवाढीचा  फटका सर्वसामान्य नागरीकांना बसला आहे, दैनंदिन कामे वाहतुकी पोटी खर्चात वाढ झाली आहे, त्यातच स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे, हि दरवाढ न परवडनारी सामान्यांच्या खिशाला कात्री लावनारी आहे,  दरवाढ मागे घेतली नाही तर लोकांच्या कर्जबाजारी पणात वाढ होवुन गरीब मानुस नागवला जानार आहे, याचा विचार करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दि. ७ सोमवारी येथिल पेट्रोल पंपावर शांततेत आंदोलन करण्यात केले.

नियोजीत वेळी आंदोलन होणार असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास पाटिल देवसरकर, माजी नगराध्यक्ष अ. अखिलभाई, कृउबा सभापती डॉ. प्रकाश वानखेडे, खरेदी विक्री संघाचे संचालक परमेश्वर गोपतवाड, मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी, शहराध्यक्ष संजय माने, माजी जिप सदस्य समद खान, सुभाष राठोड, सुभाष शिंदे, पस सभापती पिरतिनिधी बापुराव आडे, काँग्रेस अल्पसंख्यांक आयोगाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, मुनवर बेग, बाबा खान, प्रशांत देवकते, अशरफ खान, विजय सुर्यवंशी, पंडीत ढोणे, फेरोज कुरेशी, अन्वरभाई, विकास नरवाडे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या