Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वरली मटक्यापेक्षा पीकविमा कंपनी शेतक-या करिता घातक - बाबुराव कदम कोहळीकर - NNL


हदगाव, शे चांदपाशा|
जिथं शासन पीक गेल्यानंतर मदत करते तिथे पीक विमा कंपनी शेतक-याना मदत का..? करित नाही. ह्या कंपनीची कार्यशैली पाहता वरली मटक्यापेक्षा विमा कंपनी शेतक-या करिता घातक ठरत आहे. अस मत नादेड जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम (कोहळीकर ) यांनी आदोलनकर्त्या समोर मार्गदर्शन करतांना व्यक्त केलं.

दि.४जुन २०२१ ला त्यानी तहसिल कार्यालयासमोर पीकविमा करिता आदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्या अनुशगाने हदगाव व हिमायनगर तालुक्यातील भर पावासात शेतकरी पीक विमा कंपनीच्या विरोधात आदोलन करिता तहसिल कार्यालयाच्या परिसरात जमले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, हदगाव व हिमायनगर तालुक्यातील मागील २०२० या खरीप हंगामाच्या सोयाबीन व कापासाच्या ७५%टक्के पिकाची नासाडी झाली होती.

विमा कंपनी म्हणुन इफ्को टोकीयो ही कंपनी लादण्यात आलेली असुन, गेल्या अनेक महीण्यापासुन मी या कंपनीच्या मुख्यधिकारी याच्येशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे विभागीय कार्यालय नाही किवा जिल्हास्तारावर पण त्याचे कार्यालय दिसुन आलेले नाही. जेव्हा ही कंपनी माजी मुख्यमंत्री च्या भोकर तालुक्यात पीक विमा मंजुर करते. तर हदगाव व हिमातनगर तालुक्याला पीक विमा का..? मंजुर करित नाही.

जिथे शासन हदगाव व हिमायतनगरला हेक्टरी ८०० हजार मंजुर करते ही कंपनीने निव्वळ शेतक-याची लुट चालवली असल्याचा आरोप ही बाबुराव कदम यांनी केला. या बाबतीत तालुक्याचे विद्यमान आमदार व खासदार यांनी पण आपण सर्वानी राजकारण बाजुला ठेवुन या शेतक-याच्या कठीण समयी जिव्हाळ्याच्या प्रश्नवर एकञ येवू असे अहवान केले आहे. या आंदोलनावेळी हदगाव तालुक्यातील विविधता राजकीय संघटनाचे नेते त्या़च्या समावेत होते. यावेळी त्यांनी उपविभागीय आधिकारी जीवराज डापकर यांना निवेदन दिले. पोलिसांचा ही माञ चोख बंदोबस्त दिसुन आला.  

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या