Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तक्रारदाराचा संशय येताच लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल पैसे घेऊन गेला पळून - NNL


किनवट/इस्लापूर|
बियर बारचे नाहरकत प्रमाणपत्र व त्या संदर्भात पोलीस स्टेशन ईस्लापुर येथुन सकारात्मक अहवाल देण्यासाठी पंचासमक्ष १२,०००/-  रुपये लाचेची मागणी करून स्वतः लाच स्वीकारली व तक्रारदार यांचा संशय आल्याने लाचेची रक्कम घेऊन पोलीस नाईक पसार झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, येथील तक्रारदारास बियर बारची परवानगी पाहिजे असल्याने त्यासाठी त्याने अर्ज तपासणीसाठी ईस्लापूर पोलीस ठाण्यात दिला होता. याबाबत सकारात्मक अहवाल देण्यासाठी लोकसेवक पोलीस नाईक रामेश्र्वर आनंदराव आलेवाड (वय ३४ वर्ष) याने नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने या संबंधीची तक्रार बारसाठी प्रमाणपत्र मागणाऱ्याने दि.३० मे २०२१ रोजी नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. 

तक्रारीवरून प्रथमतः लाच मागणीची पडताळणी पंचासमक्ष दि. ०१ जून २०२१ रोजी करण्यात आली. त्यानंतर दि.०८ जून रोजी लाच देणारा तक्रारदार आणि सरकारी पंच पोहचले. त्यांच्यासमक्ष पोलीस नाईक रामेश्र्वर आलेवाडने यांनी लाच स्वीकारली. दरम्यान त्याला तक्रादाराचा संशय आल्याने लाचखोर पोलीस जमादार लाचेची १२ हजार रुपये घेवून पसार झाला. याप्रकरणी ईस्लापूर पोलीस ठाण्यात रामेश्र्वर आलेवाड विरुध्द रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही सापळा कार्यवाही यशस्वी करण्यासाठी पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक राहुल पखाले, पोलीस अंमलदार बालाजी तेलंगे, गणेश केजकर, सचिन गायकवाड, गणेश तालकोकुलवार, शेख मुजीब यांनी पार पाडली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या