देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत 9 जणांची माघार 12 उमेदवार निवडणूक रिंगणात -NNL


नांदेड|
देगलूर विधानसभा पोट निवडणुक उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी 21 पैकी 9 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता १२ उमेदवार निवडणुकीसाठी आहेत.  या निवडणूकीसाठी एकूण 23 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होते. यातील छाननीअंती 2 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध झाल्याने एकूण 21 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.

यात अंतापूरकर जितेश रावसाहेब इंडियन नॅशनल काँग्रेस, साबणे सुभाष पिराजीराव भारतीय जनता पार्टी, उत्तम रामराव इंगोले वंचित बहुजन आघाडी, केरकर विवेक पुंडलिकराव जनता दल (सेक्युलर), प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे बहुजन भारत पार्टी, डी डी वाघमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे), अरुण कोंडीबाराव दापकेकर अपक्ष, गजभारे साहेबराव भिवा अपक्ष, भगवान गोविंदराव कंधारे अपक्ष, मारुती लक्ष्मण सोनकांबळे अपक्ष, वाघमारे विमल बाबुराव अपक्ष, कॉ. प्रा. सदाशिव राजाराम भुयारे अपक्ष आहेत. 

हाटकर प्रल्हाद जळबा, धोंडीबा तुळशीराम कांबळे, भोरगे सूर्यकांत माधवराव, रामचंद्र गंगाराम भंराडे, रुमाली आनंदराव मरीबा,ॲड लक्ष्मण नागोराव देवकरे (भोसिकर) विठ्ठलराव पिराजी  शाबुकसार, विश्वंभर जळबा वरवंटकर ,सिद्धार्थ प्रल्हाद हाटकर या 9 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात 12 उमेदवार शिल्लक राहिल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी