एक कोटी पाच लाख रुपयांच्या विविध कंपन्यांच्या गुटखा केला नष्ट-NNL

ग्रामीण पोलीस स्टेशन हदीतील पाच गुन्ह्यात जप्त केला होता


नविन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हदीतील विविध पाच गुन्ह्यातील  प्रतिबंधीत असलेला अवैधरित्या  विक्री साठी आणलेला विविध कंपन्यांच्या गुटखा जप्त करण्यात आल्या नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार अन्न भेसळ अधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशन चा वरीष्ठ अधिकारी यांच्या ऊपसिथीत गोळीबार सराव पांगरी शिवारात सुमारे एक कोटी रुपयांच्या गुटखा पंचासमक्ष दि.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी पाचच्या सुमारास नष्ट करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला नामांकित कंपन्यांच्या गुटखा गुन्हा रजिस्टर नंबर ४५३/१९,५३८/१९ ,३३८/२०, २११/२११, १५४/२१ या पाच गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला  राजु ईलायाची,मुसाफीर पान मसाला,रंजनीगंधा ,राज निवास, विमल,बाबा१२० सुंगधी तंबाखू,वजीर केशर युक्त, दिलदार सुंगधी,ए.ए.गुटखा,वजीर एम४ सुंगधी तंबाखू,जसु सुंगधी, एन.पी.०१,बाबा १२० सुंगधी तंबाखू, बाबा १६० सुंगधी तंबाखू,एम,सुंगधी तंबाखू,आर,एम,डी पान मसाला, वि.एक, सुंगधी तंबाखू,नजर ९०००, गोल्डन पकटे बिना लेबल सुंगधी तंबाखू, सिल्व्हर पकेट  बिना लिबेल सुंगधी तंबाखू,सागर पान मसाला,सागर जर्दा  यासह अनेक कंपन्यांचे व विविध प्रकारांचे सुंगधी मसाले, तंबाखू  पाच गुन्ह्यात सुमारे एक कोटी पाच लाख रुपयांच्या गुटखा जप्त करण्यात आला होता.

या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी  जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांच्याशी चर्चा करून न्यायालयात या प्रकरणी कागदपत्रे दाखल केली होती.

न्यायालयाचा आदेशानुसार हा गुटखा नष्ट करण्याचे आदेश मिळाल्या नंतर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड व अन्न भेसळ नांदेड कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त उमेश कावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात व लेखा विभागाचे पोहेका गौतम कांबळे यांनी १८ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष जप्त केलेला गुटखा तिनं वाहना व्दारे नेऊन गोळीबार मैदान पांगरी येथे जाळुन नष्ट केला. जिल्ह्यात सर्वात मोठा जवळ पास एक कोटी पाच  लाख रुपयांच्या गुटखा नष्ट करण्यात आला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी