महाशिवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन -NNL

जास्तीत जास्त जिज्ञासूंनी लाभ घेण्याचे आवाहन !


नांदेड।
 सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित ग्रंथउत्पादीत सात्विक वस्तू तसेच फ्लेक्स प्रदर्शनाच्या माध्यमातून भगवान शिवाच्या उपासनेचे शास्त्र भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शहरातील विविध मंदिरात 'विशेष ग्रंथ प्रदर्शन कक्षउभारण्यात येणार आहेत. 

या कक्षावर अध्यात्मविषयक ग्रंथांसह राष्ट्रधर्मआयुर्वेदबालसंस्कारआदी विविध विषयांवरील ग्रंथसंपदाही उपलब्ध असेल. ही अनमोल ग्रंथसंपदा जिज्ञासूंना ज्ञानार्जनासह साधनेसाठी मार्गदर्शन करणारी आहे. यासह गोमूत्र अर्कजपमाळसात्त्विक अगरबत्तीभीमसेनी कापूरसात्त्विक अत्तर आदी पूजोपयोगी सात्त्विक उत्पादनेही मिळतील. फ्लेक्स, फलक प्रदर्शन तसेच प्रवचनच्या माध्यमातून भगवान शिवाच्या उपासनेचे शास्त्र भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे.


जिल्ह्यात लागणारे ग्रंथ प्रदर्शन कक्ष - नांदेड जिल्ह्यात 3 ठिकाणी आणि परभणी जिल्ह्यात   2 ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन कक्ष लावण्यात येणार आहेत.

नांदेड - १. काळेश्वर-विष्णुपुरी महादेव मंदिर  - सकाळी ७ पासून सायं. ७ पर्यंत
२. मुक्तेश्वर आश्रम, वसंत नगर, नांदेड - सकाळी ११ पासून सायं. ७  पर्यंत
३. श्री शिवलिंगेश्वर मंदिर सिडको. नांदेड - दु. ३ पासून ते सायं. ७ पर्यंत

परभणी - ०१. पारदेश्वर महादेव मंदिर, परभणी -  सकाळी ७ पासून रा. ९ पर्यंत  
०२. बेलेश्वर महादेव मंदिर, परभणी -  सकाळी ७ पासून सायं. ७ पर्यंत 

या अमूल्य प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री. दत्तात्रेय वाघूळदे,, सनातन संस्था, संपर्क- 9284027180

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी