हिमायतनगर शहरातील कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी -NNL

मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता.! 

कोट्यावधी रूपये विकास निधी उचल करूण ही कामाला गती नाही


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मंजूर झालेल्या १९ कोटीच्या सार्वजनिक नळ योजना पाणी पुरवठ्याचे काम अतिशय निकृष्ट व थातूरमातूर पद्धतीने उरकण्यात येत आहे. तेही काम संत गतीने गेल्या तिन वर्षापासून चालू आहे. शहरात पाईप लाईन करण्यासाठी कोट्यवधींच्या निधीतून करण्यात आलेली रस्ते खोदून ठेवल्याने शहरवाशीय नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या निकृष्ट व बोगस कामाची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात अनेक तक्रारी झाल्या असल्याने या निकृष्ट कामाचे पिटले अल्पावधीतच उघडे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हिमायतनगर शहराला कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडून १९ कोटी रूपयांची प्रभावी योजना मंजुर झाली. योजना मंजुर करण्यासाठी आजी माजी आमदाराने आप आपल्या परीने प्रयत्न केले. मात्र हिमायतनगर शहरांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न या प्रभावी योजनेच्या माध्यमातून सुटणार आहे का. हिमायतनगर शहराच्या इतिहासात एक बाब अशी दुर्दैवी ठरत गेली की, पाणी पुरवठा योजनेच्या कामाला भ्रष्टाचाराची लागण झाली आणि सातत्याने होतच गेली आहे. ग्राम पंचायत अस्तित्वात असताना अशीच ग्रीड आणी तितकीच प्रभावी योजना मंजूर झाली होती. आणी तत्कालीन सरपंच, माजी जि. प. सदस्य हे रातोरात चमकले आणी तितक्याच वेगाने ते खाली देखील कोसळले. या नंतर पुढे काहीच दिवसाने ग्राम पंचायत विसर्जित होवून नव्याने नगरपंचायत अस्तित्वात आली. 

नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा एकदा मोठी प्रभावी नळ योजना हिमायतनगर शहरासाठी  मंजुर झाली. हिमायतनगर हे एके काळी पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारे गाव म्हणून सर्व दुर चर्चा व्हायची. येथील सर्वच निवडणुकीत राजकारण पाण्यावरच गाजत असे. आता नगरपंचायत अंतर्गत १९ कोटी रूपये खर्चाची प्रभावी योजना मंजुर झाली. आणि याचे काम गेल्या ३ वर्षपासून सुरु झाले आहे. शहराच्या मंगरूळ जवळील मुरली बंधाऱ्यावरून पैनगंगा नदितून थेट हिमायतनगर शहराला पाणी पुरवठा केला जाणार आहे. विहिर खोदकाम न करताच साहहरात पाईपलाईन करण्यात येत आहे. सादर कामामध्ये हलक्या प्रतिचे पाईप टाकून पाईप लाईनचे काम उरकण्यात येत आहे. 

शहरातील बोरगडी रस्त्यावर पाणी साठवणूक टाकीचे बांधकाम करण्यात येत असून, टाकीच्या बांधकामाला नाल्याची माती मिश्रित वाळू वापरण्यात येवून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम उरकून टाकले आहे. दुसर्‍या एका टाकीचे बांधकाम ही निकृष्ट करण्यात येत असून, फुले नगर येथील टाकीचे काम होताना अनेकांनी विरोध केला होता. येथील टाकीचे बांधकाम एक शेतात केले जात आहे. शहरात पाईप लाईन करण्यासाठी ठिकठिकाणाहून रस्ता खोदकाम करूण हलक्या प्रतिचे पाईप टाकण्यात आले असून, रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून नूसताच खोदकाम करून ठेवलेला असल्याने नागरिकांची डोके दुःखी वाढली आहे.  

सदरचे काम निकृष्ट व तसेच अतिशय कासव गतीने होत असून, या कामाचे देयक जवळपास १२ कोटी रूपये निधी संबंधित ठेकेदारने उचल केला असल्याचे सांगण्यात येत आहे. कामे अर्धवट असताना आवश्यकतेपेक्षा जास्त शासनाच्या नियमाला बगल देवून निधी उचल केला असल्याचे सुजान नागरिकांतून दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे. या बाबींकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून एका विशेष पथकामार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी. आणि नियमानुसार काम पूर्ण न होता अधिक रक्कम कशी उचलण्यात आली, यासाठी कौणाकुणाचा सहभाग आहे. याची चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.  तसेच संत गतीने होत असलेल्या कामाला वेगाने गती देऊन उन्हाळ्यापुर्वी काम पुर्ण करण्यात यावे. अशी मागणी जागरूक नागरीकांतुन पुढे आली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी