प्रोफेसर डॉ.अरुणा राजेंद्र शुक्ला यांना 2022 चा राष्ट्रीय पुरस्कार -NNL


नांदेड|
नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. सौ.अरुणा शुक्ला यांना राष्ट्रभाषा हिंदी प्रचार, प्रसार निमित्त  सुचेता कृपलानी राष्ट्रीय पुरस्कार पुणे येथील महाविद्यालयात प्रदान करण्यात आला. 

राष्ट्रीय अध्यापन चेतना उज्जैन मध्य प्रदेश या राष्ट्रभाषा हिंदीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेचा पंचविसावा कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तसेच सावित्रीबाई फुले स्मृती पाचवा मातृशक्ती सन्मान सोहळा राष्ट्रीय शिक्षण चेतना संस्था पुणे येथील महाविद्यालयात देशाची मातृशक्ती, महिला सक्षमीकरण आणि भारत या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाला. 

यावेळी राष्ट्रीय मुख्य संयोजक डॉ.शहाबुद्दीन शेख, पुणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. सुवर्णा जाधव, मुंबई राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.प्रभू चौधरी, उज्जैन राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.मुक्त कान्हा कौशिक आणि आसाम गुवाहाटी कार्यकारी समितीच्या अध्यक्षा डॉ. दीपिका सुतोदिया, पुणे कॉलेजचे प्राचार्य डॉ. अल्ताफ अन्वर शेख, उपप्राचार्य डॉ. मोईनुद्दीन खान, हिंदी विभागप्रमुख डॉ. शाकीर शेख यांच्या हस्ते नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या हिंदी विभागप्रमुख डॉ. सौ.अरुणा राजेंद्र शुक्ला यांना "सुचेता कृपलानी राष्ट्रीय पुरस्कार 2022' हा पुरस्कार देण्यात आला. 

डॉ.सौ.अरुणा शुक्ला ह्या वेळोवेळी महिलांच्या विविध सामाजिक कार्यासाठी आग्रेसर राहतात. त्यांच्या कामाची दखल घेवून हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यासाठी देण्यात आला आहे.  त्यानिमित्ताने  नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सी.ए.प्रवीण पाटील, सचिव प्रा. शामलाताई पत्की, सहसचिव प्रफुल्ल अग्रवाल व सर्व सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.यु.गवई, उपप्राचार्य डी.डी.पवार, प्रा. ई.एम.खिल्लारे, प्रा. जे.डी.रत्नाकर यांच्यासह  सर्व विभागप्रमुख आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी