स्वतःच्या जिद्दीने कष्टातून आपली ओळख निर्माण करा - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

नांदेड।  महिलांनी आपल्या अंगी असलेल्या क्षमता ओळखून स्वतःच्या जिद्दीने कष्टातून आपली ओळख निर्माण करावी. कामातले आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले तर आपण सहज यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. 

येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे आयोजित महिला दिनाच्या  कार्यक्रमात त्या प्रमुख व्याख्याता म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे होते. यावेळी संस्थेचे उपप्राचार्य पी. डी. पोफळे, संस्थेतील महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष्या डॉ. ए.  ए. जोशी,  प्रबंधक श्रीमती ए. व्ही. कदम, जिमखाना उपाध्यक्ष डी. एम. लोकमनवार आदींची उपस्थिती होती.

जिद्द व चिकाटी असल्यास सामान्य घरातील मुलीही प्रगतीचे शिखरे सहज प्राप्त करू शकतात. तंत्रशिक्षण घेऊन भविष्यात घरी न बसता आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.  महिला दिनाला एक समारंभ म्हणून न बघता भरीव कार्य महिला  दिनाच्या अनुषंगाने महिलांकडून होणे आवश्यक आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त कार्यक्षम असतात. आपली शक्ती महिलांनी ओळखावी असे सांगून यावर्षीच्या जागतिक महिला दिनाचे यूएनओच्या थिमचे स्पष्टीकरण संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी सांगितले.

 

महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष डॉ. ए. ए. जोशी यांनी हेमंत परिहार यांची  कविता सादर केली. श्रीमती एस एस भोकरे यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाचे महत्व स्पष्ट केले. सूत्रसंचालन श्रीमती आर. के. देवशी यांनी केले  तर आभार प्रबंधक श्रीमती कदम यांनी मानले.यावेळी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा  तसेच संस्था स्तरावरील भारतीय प्रतिभावंत महिला यांच्यावरील प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम क्रमांक तानीया मोतिवाल व अक्षदा झींझुरडे तर द्वितीय क्रमांक वैभवी कोच्रे यांना देण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. आर. मुधोळकर, एस. ए. नरवाडे, ए. एन. यादव, के. एस. कळसकर, श्रीमती एस. जी. दूटाळ, श्रीमती व्ही. एम. नागलवार, डॉ. एस. व्ही. बिट्टेगिरी, श्रीमती ए. ए. सायर, श्रीमती पी. बी. खेडकर, श्रीमती एस. एस. गाडे, श्रीमती ए. जी. रामपुरेश्रीमती एस. एच. भोकरे, श्रीमती ए. रा. साळुंके, श्रीमती एस. बी. मेहत्रे, श्रीमती बी. आर. कोळी, श्रीमती जे. जी. मुंढे, श्रीमती ए. ए. वाघमारे, श्री. पोहरे, श्री. बोडेवरश्री. पावडेश्रीमती ए. ब. रत्नपारखीश्री हुरडुके यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive