सेव्हन स्टार्स बॉक्स क्रिकेट लिग स्पर्धेचे नांदेडात आयोजन-NNL

येत्या शनिवार दि.५ व रविवार दि.६ रोजी होणार सामने …संघ नोंदणी करण्याचे आवाहन 

नांदेड। येथील नॉकआऊट क्रिकेट ग्राऊंड माळटेकडी येथे येत्या शनिवार दि.५ व रविवार दि.६, मार्च रोजी  भव्य अशा सेव्हन स्टार्स बॉक्स क्रिकेट लिग स्पर्धेचे आयोजन करण्यात आली असल्याची माहीती स्पर्धेचे आयोजक तथा हॉटेल आशिषचे संचालक परमित बुंगई यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की,या स्पर्धेला दि. ५ मार्च (शनिवार) पासून सुरुवात होत असून, या आगळ्या वेगळ्या क्रिकेट स्पर्धेत २४ संघ सहभागी होऊ शकणार आहेत व प्रत्येक संघात ७ खेळाडू असणार आहेत तसेच सर्व साखळी सामने हे ६ षटकांचे होतील आणि बाद पद्धतीने ही स्पर्धा खेळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माळटेकडी येथील नॉकआऊट अरेना क्रिकेट  अॅकॅडमीच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत ईच्छूक संघानी सहभाग नोंदणीसाठी जुना मोंढा येथील आशिष बार अन्ड रेस्टॉरंट तसेच अमन मोबाईल व होम अप्लायंन्सेस येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   

या स्पर्धेतील सर्व सामने बाद पद्धतीने होणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास रोख १५००० रुपयांचे पारीतोषिक व करंडक तर  उपविजेत्या संघांस ७००० रु रोख पारितोषिक व करंडक देण्यात येणार असून  याशिवाय इतर वैयक्तिक पारितोषिकेही आहेत, अशी माहिती आयोजक परमितसिंग बुंगई यांनी दिली.

अधिक माहीतीसाठी व नावनोंदणीसाठी राजपालसिंग – ७७७३९३९९९७, सोनू एसआरके – ९०४९४४३३३५, गोविंद तोष्णीवाल – ८२३७८७५७३८ व जिया मिर्झा – ९९६०३०२९९२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री परमितसिंग बुंगई यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी