नांदेड-मुदखेड महामार्गासाठी २०६.५४ कोटी मंजूर; ना. नितीन गडकरी यांचा निर्णय -NNL

नांदेड - भोकर - हिमायतनगर - किनवट तसेच माहूर - अरणी रोड या रस्त्याचे २-लेन तसेच ४-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन


नांदेड, अनिल मादसवार|
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए वरील नांदेड ते मुदखेड रस्त्याची दर्जोन्नती व भूसुधारणेच्या मागणीला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असून, त्यासाठी २०६.५४ कोटी रूपयांचा निधी देण्याचेही जाहीर केले आहे. 


जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांनी या मार्गाच्या दर्जोन्नतीसाठी सातत्याने पाठपुरावा चालवला होता. उभय मंत्र्यांमध्ये मुंबई येथे झालेल्या बैठकींमध्ये हे विकास काम मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली होती. या मागणीला व पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री ना. गडकरी यांनी या कामाला मंजुरी दिली आहे. हे सुमारे १६ किलोमीटर लांबीचे काम असून, यामध्ये गोदावरी नदीवरील एका पुलाचाही समावेश आहे. ना. नितीन गडकरी यांनी या निर्णयाची ट्वीट करून माहिती दिली असून, त्यानंतर ना. अशोक चव्हाण यांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत.

https://www.facebook.com/nitingadkary विशेष म्हणजे महाराष्ट्रातील NH-161A च्या मुदखेड ते नांदेड विभागातील नांदेड - भोकर - हिमायतनगर - किनवट तसेच माहूर - अरणी रोड या रस्त्याचे २-लेन तसेच ४-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी रु. २०६.५४ कोटींसह मंजूरी देण्यात आली असल्याचे ना. नितीन गडकरी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून माहिती दिली आहे.

 https://twitter.com/nitin_gadkari/status/1505078511488274433

हिमायतनगर तालुका भाजपने मानले नितीन गडकरी साहेबांचे आभार-भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक रस्त्याचे प्रणेते केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा नितींजी गडकरी यांनी आज जाहीर केलेल्या रस्त्याच्या कामामध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण रस्त्याचे कामे मागील काही दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून हिमायतनगर, मुदखेड, भोकर, किनवट, माहूर या तालुक्यातील या सर्व भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, शंकरराव मुदंकलवाड, किशोर पाटील लगलुदकर, संदिप केंद्रे, दिनेश येऊतकर, रमन जायभाये या सर्वानी एकत्रितपणे वरील प्रमाणे नॅशनल हायवे रस्ता क्रमांक NH-161A या रस्ता संदर्भात खा.चिखलीकर यांच्या माध्यमातून मा गडकरी साहेबांना निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाप्रमाणे नितीन गडकरी साहेब यांनी आमच्या तालुक्यातील रस्त्या संदर्भात केलेली मागणी आज रोजी पूर्ण केली. त्याबद्दल देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक रस्त्याचे जनक माननीय नितींजी गडकरी माननीय खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून आमच्यासारखे सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी अतिशय दुर्गम अशा तालुक्यातून रस्त्या संदर्भात केलेली मागणी लागली आपण मार्गी लावला. त्याबद्दल सर्व तालुक्यातील जनतेच्या वतीने व तालुक्याच्या वतीने वरील सर्व मान्यवराचे मनस्वी धन्यवाद धन्यवाद..... आशिष सकवान यांनी फेसबुक पेजवरून आभार मानले आहे.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी