कुरुंदकर स्मारकासाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पात करावी-NNL

ना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आ. राजूरकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई। महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, थाेर साहित्यिक (कै.) नरहर कुरुंदकर यांचे भव्य स्मारक नांदेड येथे उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे बांधकाम मार्गी लागावे यासाठी राज्याच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी तसेच स्मारकाच्या ढाेबळ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विधानपरिषद प्रताेद आ. अमरनाथ राजूरकर यांनी आज मुंबईत प्रत्यक्ष भेटून केली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कै. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाचे संकल्पचित्र यावेळी दाखविण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, हिंगोलीचे खा. हेमंत पाटील, विधानपरिषद प्रताेद आ. अमरनाथ राजूरकर, आ. बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती. (कै.) नरहर कुरुंदकर यांच्या या स्मारकाच्या बांधकामाच्या प्रस्तावाला 2013 मध्ये मान्यता प्रदान करण्यात आली. परंतु, नंतर तत्कालीन सरकारच्या दुर्लक्ष व निधीअभावी स्मारकाच्या टप्पा क्रमांक एकचे पूर्ण कार्यान्वित झालेले नाही.


तसेच टप्पा क्रमांक एक व दाेनमधील अत्यावश्यक कामाला सुरुवात करण्यासाठी 1478 लक्ष रुपये किंमतीच्या ढाेबळ अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेत मान्यता प्रदान करण्यात आली आहे. आता या स्मारकाचे काम लवकर सुरु होऊन मार्गी लागावे, अशी नांदेडकरांची भावना आहे. त्यादृष्टीने स्मारकाच्या प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध व्हावा. ही कार्यवाही करण्यासाठी स्मारक समितीचे अध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, समितीचे कार्याध्यक्ष व जिल्हाधिकारी यांच्या समितीने राज्य शासनाकडे पाठविला आहे.


राज्याच्या 2022-2023 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात या निधीस प्रशासकीय मान्यता मिळावी आणि निधीची तरतूद व्हावी, तसेच ढाेबळ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करावी, अशी विनंती केली आहे. स्मारक समितीचे सदस्य पाेलीस अधीक्षक, नांदेड मनपाचे आयुक्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची समिती यासाठी पाठपुरावा करत आहे. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाचे बांधकाम पूर्णत्वाला जाण्यासाठी प्रशासकीय मान्यता व अर्थसंकल्पात तरतुदीची सुचना आपण द्याव्यात, अशी मागणीही यावेळी आ. अमरनाथ राजुरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईत प्रत्यक्ष भेटून केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी